‘या’ अभिनेत्रीने वीरदासच्या भारतविरोधी वक्तव्याचे केले समर्थन; म्हणाली, ‘त्यात चुकीचं काय?’

‘दिवसा महिलांची पूजा आणि रात्री शोषण’ या विधानापासून कॉमेडियन ‘वीर दास’वर भारतात देशद्रोहाचे आरोप आहेत. देशभरात वीरविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप असून त्याच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री ‘काम्या पंजाबी’ वीर दासच्या समर्थनार्थ समोर आली आहे.

काम्या पंजाबीने वीर दास यांच्या विधानाचे समर्थन करत म्हटले की, ‘मी सहमत आहे की भारताच्या दोन बाजू आहेत. एक बाजू आहे ज्याचा आपल्याला इतका अभिमान आहे की आपण मरण्यास तयार आहोत आणि दुसरी बाजू आहे ज्यासाठी आपण आशा करतो आणि ती बाजू बदलण्यासाठी कठोर परिश्रम करतो. त्यामुळे, त्यात काय चूक आहे?’.

वीर दास यांच्या यूट्यूब व्हिडिओवरून सध्या देशात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये वीर दास वॉशिंग्टन डीसीमधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये परफॉर्म करत आहेत. या सहा मिनिटांच्या व्हिडीओचे शीर्षक आहे ‘I come from two Indias’ म्हणजेच ‘मी दोन भारतातून येतो’.

व्हिडिओचा एक भाग चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये वीर असे म्हणताना दिसत आहे कि, ‘मी भारताचा आहे, जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांचे शोषण केले जाते.’ वाढता वाद पाहून आता या कॉमेडियनने ट्विटरवर एक लांबलचक नोट शेअर करून स्वतःची माहिती दिली आहे.

या नोटमध्ये वीर दास यांनी लिहिले आहे की, ‘हा व्हिडिओ दोन अतिशय भिन्न भारताच्या उत्पतीबद्दल व्यंगचित्र आहे. हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण महान आहोत हे कधीही विसरू नका आणि जो आपल्याला महान बनवतो त्यावर लक्ष केंद्रित करणे कधीही थांबवू नका.’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.