सलाम! गरीबांच्या लेकरांना शिकवण्यासाठी रोज २५ किमीचे डोंगर पार करून जाते ही शिक्षीका

प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर सुरुवातीला लहान मुलांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिक्षिकेची ओळख करून देत आहोत, ज्या गेल्या २३ वर्षांपासून डोंगरावर चढून, कठिण रस्ते पार करुन आणि दुर्गम गावांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जातात.

हा दुर्गम रस्ता पाहून चांगल्या लोकांचे मन हादरून जाईल. पण २३ वर्षात या शिक्षिकेने कधीही हार मानली नाही. कमलती डोंगरे असे या ४५ वर्षीय शिक्षिकेचे नाव आहे. बैतूलपासून २५ किमी अंतरावर असलेल्या गौला गोंडी या डोंगराळ गावात, शिक्षिका कमलती, गेल्या २३ वर्षांपासून अशा खडकाळ मार्गावर प्रवास करताच आणि विद्यार्थ्यांचे नशिब सुशोभित करण्यासाठी शाळेत पोहोचतात.

खरंतर या शाळेत जाणे सोपे नाही. या शाळेकडे जाणारा रस्ता खुपच धोकादायक आहे. जंगली प्राण्यांचे आवाज, साप, विंचू, मुसळधार पाऊस असतो. पण या सर्व गोष्टीही शिक्षिकेला या मार्गावरून चालण्यापासून रोखू शकले नाही.

कमलती डोंगरे या बैतूलच्या आधी, बसने १० किमी प्रवास करतात, नंतर लिफ्ट घेऊन १२ किमी प्रवास आणि नंतर तीन किमी सपाट आणि तीन किमी उतार असलेली टेकडीवरुन खाली उतरणे हा त्यांचा रोजचा क्रम आहे.

गावातील एकमेव प्राथमिक शाळेतील शिक्षिका कमलती, मुलांचे भविष्य घडवण्यासाठी अशाच प्रकारे २३ वर्षांपर्यंत गावात पोहोचतात. विशेष म्हणजे कमलती यांच्या कामाची दखल अधिकाऱ्यांनीही घेतली असून ते अधिकारी सुद्धा त्यांची स्तुती करताना दिसून येतात.

३१ ऑगस्ट १९९८ रोजी कमलती या शाळेत शिक्षण सेविका म्हणून रुजू झाल्या. १४ वर्षांनंतर त्या शिक्षिका आणि केवळ २२५६ रुपयांच्या पगारासह नोकरीला सुरुवात केली. कमलती यांना २०३८ नंतर या शाळेतून सेवा निवृत्त होणार आहे.

१९९८ मध्ये शाळेत लागल्यानंतर कमलती यांना मुलांना शिकवण्याची आवड इतकी होती की २८ एप्रिल १९९९ रोजी लग्नानंतर त्यांनी ठरवले की त्या गावात राहून मुलांना शिकवतील. येथे त्याने ताप्ती नदीच्या काठावर एका शेतात एका घरात त्या काही वर्षे एकट्या राहिल्या. पण त्यानंतर मुलाचा जन्म आणि त्याच्या अभ्यासामुळे त्यांना बेतुलला यावे लागले. आता त्या दररोज २५ किमी प्रवास करतात आणि गावात पोहोचतात.

संकुलचे शिक्षक राजू अथानेरे सांगतात की, जेव्हा ते स्वतः येथे तपासणीसाठी पोहोचले तेव्हा त्यांना कळले की या खडकाळ मार्गावर दररोज चढणे, उतरणे आणि प्रवास करणे सोपे नाही. सहकारी शिक्षक प्यारेलाल चौहान जवळच्या गावात मांडवा कोल येथून येथे पोहोचतात. त्यामुळे कमलती यांचे काम खरंच कौतुकास्पद आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘ब्राह्मण समाजाबद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा ब्राह्मण होते
सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा नवीन म्यूझिक व्हिडिओ होणार लवकरच रिलीज; फोटो पाहून चाहते भावुक
आईशपथ! ‘तारक मेहता…’ फेम बबिताजी करतेय 9 वर्ष लहान अभिनेत्याला डेट, नाव ऐकून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.