२४ वर्ष मोठ्या मुलीच्या प्रेमात पडले होते कमल हसन, लग्नही केले पण शेवटी…

कमल हसन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. त्यांनी साऊथसोबतच हिंदीमध्ये देखील अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. त्यामूळेच त्यांना सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक मानले जाते. करिअरमध्ये नेहमी यशस्वी होणारे कमल हसन खऱ्या आयूष्यात मात्र फ्लॉप झाले होते.

एकदा नाही तर अनेकदा ते प्रेमात पडले. त्यांनी लग्न केले पण त्यांचे कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकले नाही. खुप कमी वेळात त्यांची रिलेशनशिप खराब होत होते. याचा परिणाम त्यांच्या प्रोफेशन आयूष्यावर कधीच दिसला नाही.

कमल हसन गेले अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांनी १९७८ मध्ये वाणी गणपतीसोबत लग्न केले होते. त्यावेळी वाणी कमलपेक्षा २४ वर्षांनी मोठ्या होत्या. दोघांच्या लग्नामूळे अनेकांना धक्का बसला होता. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. १९८८ मध्ये दोघे वेगळे झाले.

दोघांच्या वेगळे होण्याचे कारण अभिनेत्री सारिकाला ठरवले गेले. त्यावेळी सारिका आणि कमल हसन रिलेशनशिपमध्ये होते. पहील्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर एका वर्षाच्या आतच कमल हसनने सारिकासोबत लग्न केले. कारण सारिका त्यावेळी गरोदर होती.

सारिकाने श्रुतीला जन्म दिला. त्यानंतर १९९३ मध्ये त्यांना अक्षरा ही दुसरी मुलगी झाली. यांच्या सुखी संसारात तुफान त्यावेळी आले जेव्हा कमल हसन २२ वर्ष छोटी अभिनेत्री सिमरन बग्गाला डेट करु लागले. ही गोष्ट ज्यावेळी सारिकाला समजली. त्यावेळी त्यांना धक्का बसला.

लग्नाच्या १६ वर्षांनंतर सारिकाने कमल हसनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये कमल आणि सारिका वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाचा परिणाम त्यांच्या मुलींवर देखील झाला होता. पण आज मात्र दोन्ही मुली आई वडीलांच्या घटस्फोटाने आनंदीत आहेत.

आई वडील वेगळे झाले त्यावेळी श्रुती हसन १६ वर्षांची होती. पण ती आई वडीलांच्या घटस्फोटाने खुप आनंदी होती. तिचे म्हणणे होते की, ही त्यांच्या आयूष्यातील सर्वात चांगली गोष्ट होती. श्रुतीने स्वत: एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे.

श्रुती हसनने सांगितले की, ‘ज्यावेळी तिचे आई वडील वेगळे झाले त्यावेळी ती छोटी होती. पण तिच्या आई वडीलांच्या घटस्फोटाने ती आनंदी होती. कारण त्यांचा निर्णय योग्य होता. दोन व्यक्तिंचे एकमेकांसोबत पटत नसेल तर मग त्यांनी वेगळे झालेल योग्य आहे’.

तिने पुढे सांगितले की, ‘तिला तिच्या आई वडीलांच्या निर्णयावर गर्व आहे. दोघेही खुप चांगले आहेत. त्या दोघांमध्ये देखील खुप काही खास आहे. आजही मी माझ्या आई वडीलांच्या खुप क्लोज आहे. हा निर्णय त्यांच्या कुटूंबासाठी सोपा आणि आनंददायी होती’.

श्रुती हसनने देखील आई वडीलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय़ घेतला. आज ती साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. २००९ मध्ये तिने लक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. आज ती साऊथसोबतच बॉलीवूडचा देखील प्रसिद्ध चेहरा आहे.

महत्वाच्या बातम्या –
शाहरुखचा मुलगा अब्रामची आई गौरी खान नाहीये, तर कोण आहे माहितीये का?
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केला स्काय व्हिला, किंमत ऐकून बसेल धक्का..
अरे बाप रे! नेहा कक्करने मेकअप नसलेला व्हिडिओ केला शेअर; तिचा नवरा म्हणाला…
संजय दत्तला मिळाला युएईचा ‘गोल्डन व्हिसा’; हा बहूमान मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.