‘अर्णब, तुला भारतात भीती वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जा’

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी मुंबईच्या राहत्या घरातून अटक केली. यानंतर राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अर्नब गोस्वामी यांच्या अटकेच्या प्रकरणावरून भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आले आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे.

अशातच आता अभिनेता कमाल आर खानने ट्विट करत अर्णब यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जर अर्णबला भारतात भीती वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये निघून जावे’, असे त्याने ट्विटमध्ये म्हंटले आहे. सध्या हे ट्विट प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

दरम्यान, त्याने पुढे केलेल्या एका ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘माझ्या जीवाला धोका आहे असे त्याने (अर्णब) बोलायला नको होते. त्याने देशातील न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा होता. तो नेहमी म्हणायचा की कोणाला भारतात भीती वाटत असेल तर त्याने पाकिस्तानमध्ये निघून जावे. आज तो स्वत: घाबरला आहे? का?’ असे केआरकेने म्हंटले आहे.

अन्वय नाईक प्रकरण काय आहे?
अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तसेच तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.

तसेच अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

आता आले टाटाचे कोरोना टेस्ट किट; चिनी टेस्ट किटपेक्षा आहे भारी; खर्चही कमी
अर्णब, तुला भारतात भीती वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जा; बड्या अभिनेत्यानेच्या ट्विटने खळबळ
७० आणि ८० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा राजू आज असे आयुष्य जगतो

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.