काळीज पिळवटून टाकणारी घटना; मुलींनी आईच्या मृतदेहाला दिला खांदा आणि मुखाग्नी

राज्यात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडेच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मृत्यूच्या संख्येत पण दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.

अशीच एक मन सुन्न करणारी घटना महाराष्ट्र राज्यात घडली आहे. रूढी परंपरांना तिलांजली देऊन मुलींनी त्यांच्या आईच्या मृतदेहाला खांदा दिला. मुलींनीच आईच्या मृतदेहाला मुखाग्नी पण दिला आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार जवळच्या जांब गावात सदर घटना घडली आहे. या गावातील लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायला मुलगा नसल्यामुळे मुलींनाच पुढे व्हावे लागले.

मृतदेहाला खांदा आणि मुखाग्नी देण्याचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा कोण देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यात लहान मुलगी पुढे झाली आणि म्हणाली मी मुखाग्नी देते. बाकीच्या चार मुलींनी खांदा देण्याचे ठरवले.

कमी नातेवाईक असल्यामुळे त्यांचा हा निर्णय सर्वानी मान्य पण केला. कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पळून हा अंत्यविधी करण्यात आला. या घटनेमुळे मुलींनी केलेल्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

आपल्याकडे असणाऱ्या सर्व रूढी परंपरांना झुगारून मुलींनी हा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांच्या या निर्णयाने समजत आदर्श घालून दिला आहे.

ताज्या बातम्या
‘अरे बाबा काहीतरी नियम पाळा’, कोरोनाच्या भितीने अजित पवारांनी पुष्पगुच्छ नाकारला

पांरपारिक शेतीला फाटा देत केली श्रीलंकेच्या कोलंबस नारळाची शेती, कमावतोय १० लाख

कोरोनाने आपल्या जवळची माणसे गमावली; डॉक्टरांसोबत संवाद साधताना मोदींना आले रडू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.