Share

kalicharan maharaj : डुकराचा दात रात्री पाण्यात ठेवा, ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा.. कालीचरण महाराजांचा वादग्रस्त दावा

kalicharan maharaj

kalicharan maharaj shocking statement  | कालीचरण महाराज हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. ते अनेकदा काही वादग्रस्त वक्तव्ये सुद्धा करताना दिसून येतात. अशात अहमदनगर येथे सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहादवरती एक कायदा करावा यासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी बोलताना कालीचरण महाराजांनी एक अजब दावा केला आहे. डुकाराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि मुलीला ते पाणी प्यायला द्या. बघा मग तिचं डोकं कसं ठिकाण्यावर येतं ते. सर्व भूत, प्रेत तिच्या अंगातून बाहेर येतील, असे कालीचरण महाराजांनी म्हटले आहे.

कालीचरण महाराजांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतरविरोधी संपुर्ण महाराष्ट्रासह देशात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू धर्माच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

कालीचरण महाराज म्हणाले की, लव्ह जिहादची रोजची ४० हजार प्रकरणे आहे. दिल्लीतच ३५ प्रकरणे समोर आली होती. तसेच मुलींचे वशीकरण केले जाते. धडग्यावर जे डोकं टेकवतात त्यांच्या अंगात भूतं येतात, असा अजब दावा यावेळी कालीचरण महाराजांनी केला आहे.

तिकडे गेलं की तुमच्यावर तंत्र-मंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवला पाहिजे. ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकाण्यावर कसं येत नाही. सकाळी तिच्या अंगातील भूत प्रेत सुद्धा गायब होतील, असे कालीचरण महाराजांनी म्हटले आहे.

सर्व आतंकवादी मुस्लिमच आहे. सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर हिंदू राष्ट्र निर्माण झाला असता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही म्हणतात की, मुस्लिमांवर विश्वास ठेवू नका, असे कालीचरण यांनी म्हटले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे राजे नव्हते तर ते हिंदूंचे राजे होते, असेही कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
sushma andhare : सुषमा अंधारेंचे लोंटागण! जाहीरपणे मागीतली वारकऱ्यांची माफी; वाचा नेमकं घडलं तरी काय…
rajratna amedkar : पाटलांवर शाईफेक करणाऱ्याला आंबेडकरांनी जाहीर केले १ लाखांचे बक्षीस; म्हणाले, मला संधी मिळाली नाही पण…
अर्जून तेंडूलकरने पदार्पणाच्या सामन्यातच धडाकेबाज शतक झळकावत केली गोलंदाजांची धुलाई

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now