Share

Kajol : नको तिथे स्पर्श, दुर्गा पूजेत काजोलसोबत गैरवर्तन? तो माणूस कोण, व्हायरल व्हिडीओचं खरं सत्य

Kajol : नवरात्रोत्सवात कोलकात्यातील प्रसिद्ध मुखर्जी दुर्गा पूजा पंडाल (Mukherjee Durga Puja Pandal) नेहमीच चर्चेत असतो. येथे दरवर्षी अनेक कलाकार आणि सेलिब्रेटी दर्शनासाठी येतात. यावर्षीही अभिनेत्री काजोल (Kajol Actress Bollywood) आणि तिची चुलत बहिण राणी मुखर्जी (Rani Mukerji ) यांनी उपस्थित राहून उत्सवात भाग घेतला. विजयादशमीच्या निमित्ताने झालेल्या सिंदूर खेला (Sindoor Khela Festival Kolkata) दरम्यानचा काजोलचा एक व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हात पकडणारा तो माणूस कोण?

काजोल देवीच्या दर्शनासाठी पायऱ्या उतरत असताना तिच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तिला हाताने थांबवलं. तो प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. सुरुवातीला हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त केला गेला. काहींनी त्या व्यक्तीला दोष दिला, तर काहींनी काजोलच्याही प्रतिक्रिया चर्चेत आल्या.

पण तपासल्यावर समोर आलं की, हात पकडणारा तो माणूस कुणी अनोळखी नसून पंडालमधील स्वयंसेवक (Volunteer At Pandal Kolkata) होता. गर्दीत काजोलला थांबवून त्याला सेल्फी घ्यायचा होता. त्यामुळे त्याने हात धरून तिला थोडं वर नेलं आणि त्यानंतर तिच्यासोबत फोटो काढला. काजोलनंही त्याला नकार न देता सेल्फीसाठी पोझ दिली.

पंडालातील वातावरण

या पूजेत मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटी सहभागी झाले होते. जया बच्चन (Jaya Bachchan Bollywood Actress), सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांसारख्या कलाकारांनी पंडालात दर्शन घेतलं. सिंदूर खेलादरम्यान मोठी गर्दी असल्याने स्वयंसेवकांनी व्यवस्था पाहिली होती. त्याच वेळी हा व्हिडिओ शूट झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bol Bollywood (@bolbollywood.in)

सध्या काजोल “Too Much with Kajol and Twinkle” या टॉक शोद्वारे प्रेक्षकांना भेटत आहे. तसेच ती लवकरच “द ट्रायल: प्यार खून धोका” सीझन 2 आणि प्रभू देवा (Prabhu Deva Actor) याच्या “Maharagni: Queen of Queens” या चित्रपटात दिसणार आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now