कधी कधी काहीही न करणेच चांगले असते म्हणत काजोलने शेअर केला वनपीसमधील फोटो; फोटो पहाल तर पहातच रहाल

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर ती खुप ऍक्टीव्ह असते. ती रोज वेगवेगळे फोटो शेअर करत असते. काजोलचे अनेक फोटो व्हायरल असतात.

आताही काजोलने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. चाहत्यांना तिची ही स्टाईल चांगलीच पसंत पडत आहे, हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिचा फोटो शेअर केला असून तिच्यासोबत एक कोटही शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये, आराम करा, रिचार्ज करा आणि रिफ्लेक्ट करा. कधीकधी काहीही न करणे चांगले असते – आयजी व्हिक्टोरिया ओडियास, असे तिने लिहिले आहे.

तिचा मूड आराम करण्याचा आहे, हे या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. चाहते या फोटोवर सतत कमेंट करत आहेत. काहीच तासांमध्ये या फोटोला ७५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.

या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे. तिचे चाहते तिच्या या फोटोचे कौतूक करत आहे. काजोलचे चाहते तिला ‘बॉस लेडी’ म्हणत आहे. असे असताना एका चाहत्याने लिहिले आहे, लव्ह यू सिमरनजी डीडीएलजे. आम्हाला तुमची खूप आठवण येत आहे.

त्याचवेळी एका चाहत्याने तिला शाहरुख खानसोबत दुसरा चित्रपट करण्याची विनंती केली आहे. त्याने लिहिले की, आम्हाला शाहरुख खानसोबत दुसरा प्रोजेक्ट हवा आहे. तू माझी आवडती अभिनेत्री आहेस आणि मला तुझी खूप आठवण येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

बापरे! ४ फ्लॅट, ५० तोळे सोनं, २२ लाख कॅश; ३५ हजार पगार असणाऱ्या सोसायटी मॅनेजरकडे कोटींची मालमत्ता
सरकार झोपा काढतय! मिरचीला १ रूपये किलोचा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने झाडे उपटली; व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी येईल
महेश कोठारेंनी मागितली जाहीर माफी, गौतम बुद्धाच्या फोटोवरून झाला होता वाद…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.