अक्षय कुमार होता काजोलचा पहीला क्रश; पार्टीमध्ये त्याला शोधत बसायची अभिनेत्री

बॉलीवूड कपलच्या प्रेम कहाण्या तर सगळीकडेच प्रसिद्ध आहेत. फक्त चित्रपटच नाही तर काही प्रेम कहाण्या खऱ्या आयूष्यात देखील गाजल्या. अशी प्रेम कहाणी आहे बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि सिंघम अजय देवगनची. दोघांच्या स्टोरीच्या चर्चा आजहा होतात.

काजल आणि अजयच्या लग्नाला २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. पण तरीही त्यांचे नाते तसेच आहे. एवढ्या दोघांनी कधीच वेगळे होण्याचा विचार केला नाही. पण खुप कमी लोकांना माहीती असेल की, अजयला भेटण्यापूर्वी काजोल एका दुसऱ्या अभिनेत्यावर फिदा होती. जाणून घेऊया कोण होता तो अभिनेता.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर काजोल एका अभिनेत्यासाठी वेडी झाली होती. त्याच्यासाठी ती अनेकदा पार्टीमध्ये जायची. अनेक वेळा तर ती दोनदा चित्रपट पाहायची. या गोष्टीचा खुलासा काजोलचा खास मित्र करण जोहरने केला आहे.

काजल ज्या अभिनेत्यावर फिदा झाली होती. त्याचे नाव होते अक्षय कुमार. ही गोष्ट खरी आहे. अक्षयने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला त्यावेळी अनेक मुली त्याला बघून पागल झाल्या होत्या. त्याच मुलींपैकी एक म्हणजे काजोल. अक्षयचा पहीला चित्रपट रिलीज झाला तेव्हापासून तो तिला आवडत होता.

करण जोहरने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. करणने सांगितले की, आज अजय अजय करणारी काजोल एकेकाळी अक्षय अक्षय करत होती. अक्षय काजोलचा क्रश होता. त्याला बघण्यासाठी ती काहीही करायची. अक्षयसाठी काजोल पुर्णपणे पागल झाली होती.

करणने पुढे सांगितले की, एका पार्टीरमध्ये काजोलची आणि माझी भेट झाली होती. त्यावेळी ती अक्षयला शोधण्यासाठी मला सोबत घेऊन गेली होती. तेव्हा अक्षय तर भेटला नाही पण काजोल आणि माझी चांगली मैत्री झाली. तिने अक्षयसाठी अनेक गोष्टी केल्या होत्या. पण मी त्या सांगू शकत नाही.

आज अक्षय आणि काजोल खुप चांगले मित्र आहेत. १९९८ मध्ये काजोलने अजय देवगनसोबत लग्न केले. पण लग्नापूर्वी ती अक्षयसाठी पागल होती. तिने स्वत या गोष्टीचा खुलासा केला नसला ती करणने मात्र या गोष्टीचा खुलासा केला.

महत्वाच्या बातम्या –
भाईजानसाठी कायपण! सलमानच्या ‘राधे’च्या प्रमोशनसाठी अभिनेत्री पीपीई किट घालून रस्त्यावर
राजकुमारला भेटण्यासाठी भितींवरून उडी मारून त्यांच्या घरात घुसला होता सलमान खान
विनोद खन्नासोबत रोमँटिक सीन द्यायला घाबरायच्या अभिनेत्री; कारण ऐकून धक्का बसेल
बॉलीवूडमधील लोकप्रिय नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.