नऊ तास नोकरी करून ‘या’ महिलेनी केली यूपीएससीची परीक्षा पास

 

आपण अनेकदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तासनतास अभ्यास करताना बघत असतो. तरीही अनेकांना ती उत्तीर्ण होणे कठीण जाते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेची गोष्ट सांगणार आहोत जिने ९ तास काम करून यूपीएससीही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

हरियाणात राहणाऱ्या या महिलेचे नाव काजल ज्वाला असे आहे. तिने ९ तासांची नोकरी करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय तिने ही परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली आहे.

अनेकदा महिलांना लग्न झाल्यानंतर नोकरी करण्यास अडचण येते, पण लग्नानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यास काजलला कधीच कुठलीही अडचण आली नाही. उलट घरची जबाबदारी सांभाळण्यात त्यांच्या पतीने महत्वाची भूमिका बजावली होती.

त्यांच्या पतीचे नाव आशिष मलिक असे आहे. आशिष यांनी कधीही काजल यांना घरकामात गुंतवले नाही, त्यांनी नेहमीच काजलला यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे काजल यांना जितका वेळ मिळायचा तितका वेळ ती अभ्यास करायची.

काजल यांनी आपल्या अभ्यासाचे नीट नियोजन करून ठेवले होते. त्यासोबत त्या नोएडामध्ये नोकरी सुद्धा करायच्या. त्यांना नोकरीला जाण्यायेण्यासाठी खूप वेळ लागायचा. जवळपास ३ तास लागायचे त्या तीन तासात ते अभ्यास करायच्या.

त्यावेळात त्या अशा विषयांचा अभ्यास करायच्या ज्यात एकाग्रततेची गरज पडत नाही. चालु घडामोडी, वर्तमानपत्र आणि मासिके त्या वाचायच्या. घरी आल्यानंतर त्यांना फक्त १ ते २ तास अभ्यासासाठी मिळायचे, तेव्हा त्या पूर्णपणे एकाग्रतेने अभ्यास करत होत्या. तसेच आठवड्याच्या सुट्टीत ते पूर्ण दिवस अभ्यास करत असायच्या.

काजल यांच्या म्हणण्यानुसार यूपीएससीचा अभ्यासक्रम समुद्रासारखा आहे, जो कधीच संपत नाही. पण आपल्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे त्यांनी मोजकाच अभ्यास करायचा ठरवला आणि सतत त्याचे रिव्हिजन ते करत असायच्या.

त्यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांना महत्व दिले. तसेच इतिहासासाठी आर. एस. शर्मा, भारतीय राजकारणासाठी लक्ष्मीकांत, भूगोलसाठी गोए चेंग लेओंग यांच्या पुस्तकांचा अभ्यास केला. तसेच गेल्यावर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास पण त्यांनी केला होता.

तिला ही यूपीएससीची परीक्षा पास करणे सोपे नव्हते. तिने याआधीही परीक्षा दिली होती पण तिला यश नव्हते मिळाले. पण २०१८ मध्ये २८ वी रँक मिळून त्यांनी यूपीएससीची परीक्षा पास केली आहे आणि त्या आयएएस बनल्या आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

काठी टेकत राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला आलेले हे आजोबा नक्की कोण?

विराट-अनुष्काच्या लेकीला बॉलीवूड कलाकारांनी दिले महागडे गिफ्ट, वाचून डोळे फिरतील

असा कोणता प्राणी आहे जो कधीच पाणी पीत नाही? IAS इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला प्रश्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.