Share

Abdul Sattar : अब्दुल सत्तार नावाचा प्राणी मंत्री होतोय हे दुर्दैव; ते यापुर्वीही ‘या’ मंत्र्यांच्या अंगावर धावून गेलेत’

Abdul Sattar

Abdul Sattar : नुकतीच शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव खतगावकर यांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याची ही बातमी आहे. या प्रकरणावर आता काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.

जालना येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. त्यांनी अब्दुल सत्तारांना प्राणी म्हणून संबोधले आहे. अब्दुल सत्तार हे पाठीत खंजीर खुपसतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

यावेळी कैलास गोरंट्याल म्हणाले की, अब्दुल सत्तार नावाचा जो प्राणी आहे, तो दुसऱ्या तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. अब्दुल सत्तार कधीही कोणाशीच चांगले वागत नाही. त्यांचं काम पडेल तेव्हा ते समोरच्या व्यक्तीच्या पाया पडतील, त्याची बॅग उचलतील, असे ते म्हणाले.

मात्र, काम झाल्यानंतर अब्दुल सत्तार त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसतात. याआधीही ते निलंगेकर साहेब मंत्री असताना त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच छगन भुजबळ साहेब मंत्री असताना त्यांच्याही अंगावर धावून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा ॲटीट्युड तसाच आहे. ते मॅनर्सलेस व्यक्ती आहेत, असेही ते अब्दुल सत्तारांना म्हणाले आहेत.

पुढे बोलताना कैलास गोरंट्याल यांनी एक उर्दू शेर म्हणत अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला आहे. “इफ्तीदा इश्क में होता है क्या, आगे आगे देखिये होता है क्या!” असे म्हणत त्यांनी सत्तारांवर टीका केली आहे. कैलास गोरंट्याल यांनी अब्दुल सत्तारांना चांगलेच धारेवर धरले आहे.

तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक विनंतीही केली आहे. ते म्हणाले की, माझी प्रामाणिकपणे एकनाथ शिंदेंना विनंती आहे की, अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. आता या सगळ्या प्रकरणावर अब्दुल सत्तार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या विधानामुळे राजकीय भूकंप! या पदासाठी उद्धव ठाकरेंना दिला जाहीर पाठिंबा 
Abdul Sattar : अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग
Abdul Sattar : अखेर ठरलं! हे आहेत शिंदे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis : अब्दुल सत्तारांचा उतावीळपणा पाहून फडणवीसांनी त्यांना मंत्रिमंडळ बैठकीत झापलं, म्हणाले, परस्पर..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now