‘कच्चा बदाम’ गाण्याचा गायक भुबन बड्याकर(Bhuban Badyakar) याच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भुबन बड्याकर यांचा सोमवारी रात्री अपघात झाला आहे. या अपघातात गायक(Singer) भुबन बड्याकर जखमी झाले आहेत. त्यांना पश्चिम बंगालमधील(West Bengal) बिरभूममधील विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(kaccha badam singer bhuban bydkar car accident)
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कच्चा बदाम’ गाण्याचे गायक भुवन बड्याकर हे कार चालवायला शिकत होते आणि याच दरम्यान त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या छातीला आणि इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भुबन बड्याकर यांची तब्येत सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
भुबन बड्याकर हे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. भुबन यांचा शेंगदाणे विकण्याचा व्यवसाय होता. भुबन दररोज शेंगदाणे विकून २००-२५० रुपये कमवत होते. त्यानंतर कोणीतरी त्यांचे ‘कच्चा बदाम’ गाणे सोशल मीडियावर अपलोड केले. ‘कच्चा बदाम’ हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
त्यानंतर भुबन बड्याकर देशात फार लोकप्रिय झाले. लोकांनी त्यांच्या गाण्यांचे व्हिडीओ आणि इंस्टाग्राम रील्स बनवले. ‘कच्चा बदाम’ या गाण्याची भुरळ बॉलिवूडमधील कलाकारांनाही पडली होती. यानंतर भुबन बड्याकर यांचे आयुष्य अचानक बदलले. त्यांना पश्चिम बंगालमधील एका क्लबने गाण्याची ऑफर दिली.
काही दिवसांपूर्वी एका संगीत कंपनीने भुबनला त्याच्या आगामी ट्यूनसाठी दीड लाख रुपये रॉयल्टी म्हणून दिले आहेत. एका म्युझिक कंपनीने भुबनला लाखो रुपयांचा चेक देऊन म्युझिक व्हिडिओसाठी साइन केले होते. अनेक टीव्ही कार्यक्रमांमधून भुबन यांना निमंत्रण देण्यात आले होते. सध्या भुबन बड्याकर यांनी शेंगदाणे विकणे बंद केले आहे.
सोशल मीडियावर मिळालेल्या लोकप्रियतेबद्दल भुवन यांनी सांगितले की, “तुम्ही ज्या प्रकारे माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.” भुबन बड्याकर लवकर बरे व्हावेत, यासाठी सोशल मिडीया युझर्स प्रार्थना करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
प्रेयसीची ‘ही’ मागणी पूर्ण न करू शकल्याने तरुणाने घेतला गळफास, व्हॉट्स ऍप चॅट पाहून पोलिसही हैराण
‘पुष्पा’ स्टाईल दारूच्या तस्करीचा प्रयत्न फसला, टँकर पाहून पोलिसही झाले अवाक
भारताच्या ‘या’ ऑल राऊंडरची प्रतिस्पर्धींना भीती; भारतीय संघ त्याच्याशिवाय वर्ल्ड कपमध्ये उतरणारच नाही