जिद्दीला सलाम! नेत्रहीन असणारी ही तरुणी बनली कमी वयात पीएचडी पुर्ण करणारी पहिली महिला

 

 

प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपले ध्येय गाठणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही ऐकले असेल, आता या यादीत पुन्हा एक नवीन नाव जुडले आहे ते म्हणजे जोत्सना फनीजा.

नेत्रहीन असणारी जोत्सना २५ वर्षाच्या वयात पीएचडी पास करणारी पहिली बनली आहे. जोत्सनाचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. तिला लहानपणापासूनच अंधत्व होते. पण तिची इच्छाशक्ती प्रचंड होती.

१० वी पर्यंतचे शिक्षण तिने नरसापुरच्या आंध्र ब्लाईंड हायस्कुलमधून केले होते. त्यानंतर तिने विजयवाडाच्या मेरिस टेला कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले होते, तेव्हा तिला गोल्ड मेडल मिळाले होते.

तिने प्रत्येक वेळेस आपली योग्यता सिद्ध करुन दाखवली पण जेव्हा ती मुलाखतीला गेली तेव्हा तिला खुप अडचणी आल्या. दिव्यांग असताना तुम्हाला मुलांना सांभाळता कसे येईल, तुम्हाला मुलांची हजेरी घेता येईल का असे प्रश्न तिला विचारात अनेकवेळा तिला नकाराचा सामना करावा लागला. पण तरीही तिने कधीच हार मानली नाही.

तिने निर्णय घेतला की कितीही नकार आले तर हार मानायची नाही आणि इंटरव्ह्युव देत राहायचे. शेवटी तिला यश मिळालेच सध्या ती दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे. जोत्सनाचा एक कविता संग्रही आहे. जे प्रकाशित झाला असून त्याचे नाव सिरेमिक इवनिंग असे आहे.

ज्योत्सनाने आता भारतीय विश्वविद्यालयातून इंग्रजी साहित्य विषयात पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. पीएडी करणारी जोत्सना ही भारतातील पहिली बनली आहे.

खरंतर जोत्सनाला इतिहास, अर्थशास्त्र, आणि नागरिक शास्त्रमध्ये शिक्षण घेणार होती, पण महाविद्यलयाने तिला प्रवेश दिला नाही. तिला या गोष्टीसाठी पण तिचा स्वता:वर विश्वास होता, त्यामुळे तिने २०११ मध्ये राष्ट्रीय पात्रता असणारी परिक्षा पास केली होती.
जोत्सानाने कधीही तिच्या शारिरीक आणि आर्थिक अडणींना आपल्या ध्येयाच्या पीएचडी पुर्ण केल्यानंतर सर्वत्र तिचे कौतूक केले जात आहे. आता तिची जिद्द अनेकांसाठी आता प्रेरणादायी ठरत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.