विमानतळ उद्घाटनासाठी ज्योतिरादित्य शिंदेंचा ठाकरेंना फोन; राणेंचा जाहीर अपमान करत जागा दाखवली

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात वाद सुरू आहे. यातच राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे अटक करण्यात आली होती. यामुळे राजकीय वातावरण तापले होते. आता चिप्पी परूळे विमानतळाच्या उद्घाटनावरून देखील राजकारण तापले आहे.

सिंधुदुर्गमधील या विमानतळाचे उद्घाटन ९ आक्टोबरला होणार आहे. यामुळे पुन्हा श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलवण्याची गरज नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे. यामुळे हा वाद सुरू झाला आहे.

असे असताना आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रतिउत्तर देत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन उद्घाटनाची वेळ ठरवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनीच नारायण राणे यांना याबाबत अंधारात ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात सकाळी चर्चा झाली. यावेळी चिप्पी विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणे झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला १२ वाजता फोन करून सांगितले की, आम्ही ९ तारीख फिक्स केली आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवायचे की नाही बोलवायचे याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, राणे कोण लागून चालले? असा सवालही राऊत यांनी केला. यामुळे आता राणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

रानू मंडलच्या बायोपिकमध्ये काम करण्यास अनेक अभिनेत्रींनी दिला नकार, शेवटी ‘या’ अभिनेत्रीने पुढाकार घेत दिला होकार

उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पायी निघाला, पतीच्या खांद्यावर पत्नीचा करुण अंत झाला..

ब्रेकींग! टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा, धोनीसह ‘या’ खेळाडूंची झाली निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.