त्या ४० हजार कोटी रुपयांचा वारसदार कोण? ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संपत्तीचा वाद कोर्टात?

संपत्तीचा मोह हा कोणाला नसतो? असेच संपत्तीचे वाद सर्वसामान्य माणसांपासून ते बड्या बड्या राजकारणी लोकांच्या घरात देखील होतात. असाच संपत्तीचा वाद केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कुटुंबीयांमध्ये चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.

ज्योतिरादित्य यांच्या कुटुंबाकडे तब्बल ४०, ००० कोटींची संपत्ती असल्याचा दावा ज्योतिरादित्य यांच्या आत्त्यांनी केला आहे. ज्योतिरादित्य यांना तीन आत्त्या आहेत. त्या म्हणजे उषाराजे शिंदे, वसुंधराराजे शिंदे, आणि यशोधरा राजे शिंदे.

यामध्ये सर्वात मोठी आत्त्या उषाराजे‌ शिंदे यांचा विवाह नेपाळच्या राजघराण्यात झाला असून त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे त्यामुळे त्यांना ज्योतिरादित्य यांच्या संपत्तीत रस नाही. दुसऱ्या आत्त्या या राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या असून त्यांचाकडेही अमाप संपत्ती आहे.

तिसऱ्या आत्या यशोधरा शिंदे यांचा प्रेमविवाह झाला असून त्या विदेशी स्थायिक झाल्या होत्या मात्र त्याचा विवाह जास्त काळ टिकू शकला नाही त्यामुळे परत त्या भारतात स्थायिक झाल्या.

सध्या त्या मध्य प्रदेशमधील सरकारमध्ये मंत्री आहेत. ज्योतिरादित्य यांच्या तिसऱ्या आत्त्याला म्हणजेच यशोधरा राजे शिंदे यांना संपत्तीमध्ये त्यांचा वाटा हवा आहे. संपत्तीचा वाद हा तिन्ही बहिणींनी आपापसात मिटवण्याचा प्रयत्न केला पण तो वाद काय मिटला नाही आणि यशोधराराजे शिंदे यांनी कोर्टात धाव घेतली.

ज्योतिरादित्य यांची संपत्ती अफाट असल्याने १९५७ पासून राजकारणात असलेले शिंदे घराण्यांनी निवडणूक पत्रात २ अब्ज रुपयांहून अधिक संपत्तीचा उल्लेख केला होता. पण ज्या संपत्तीवरून कोर्टात वाद सुरू आहे ती संपत्ती तब्बल ४०,००० कोटींची आहे. यामध्ये जयविलास पॅलेस याचा समावेश आहे.

 

महत्वाच्या बातम्या
पैसे नाहीत म्हणून ट्रॅक्टरसाठी गाय विकली, आता १८० ट्रॅक्टर उभे करण्यासाठी जमीन कमी पडू लागली
ही आहे जगातील सगळ्यात शांत जागा जेथे शरीरातून वाहणाऱ्या रक्ताचाही आवाज येतो, वाचून अवाक व्हाल
ती चारित्र्यहीन आहे, तिला लाजलज्जा नाही, पडद्यावर चुंबन घेते; मल्लिकाने सांगीतला बाॅलीवूडचा खतरनाक अनुभव
‘राष्ट्रवादीचा गृहमंत्री असल्यावरच दाऊद कसा सक्रिय होतो?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.