Video: पाहुणा बनून आहेर घेऊन पळून जायचा, लोकांच्या हाती लागला तर लोकांनी चोप चोप चोपला

 

सध्या सगळीकडेच लग्नसराईचे वातावरण आहे, अशात लग्नामध्ये धक्कादायक घटना घडतानाच्या अनेक बातम्या आपण पाहत असाल, आता अशीच घटना जुन्नरमध्ये झालेल्या एका लग्नात घडली आहे.

जुन्नरमध्ये एक माणूस लग्नात पाहुणा बनून येत असून तो आहेर चोरी करत असल्याची धक्कादायक घडली आहे. मूळ पिंपळगाव जोगे येथे राहणाऱ्या या माणसाचे नाव संदीप धोतरे असे आहे. संदीपला आता ओतूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

संदीप हा रोज वेगवेगळ्या लग्नात पाहुणा बनून जायचा. तसेच तिथे आलेल्या लोकांशी ओळख करून आहेर घेण्यासाठी बसायचा. आहेर मिळताच तो त्या लग्नातून पसार व्हायचा. अशा अनेक ठिकाणचे आहेराचे पैसे संदीपने चोरले आहे.

असाच एका लग्नात संदीप आला होता, तेव्हा एका माणसाने त्याला ओळखले, तसेच त्या माणसाने संदीपबद्दल आजूबाजूच्या लोकांना सांगितले. त्यावेळी तिथल्या लोकांनी त्याला जबर चोप दिला असून त्याला पोलिसांच्या हवाली केले. सध्या संदीपला ओतूर पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.