भारतीय संघात झाली जुन्नरच्या पठ्ठ्याची निवड; आता निळ्या जर्सीत दिसून येणार कौशल तांबे

भारतीय संघात क्रिकेट खेळण्याची अनेकजणांचे स्वप्न असते, पण हे स्वप्न सर्वांचेच पुर्ण होत नाही. पण जुन्नरमधल्या ओतूरच्या कौशल तांबेने आपले स्वप्न पुर्ण केले आहे. कौशल याची कोलकाता येथे होणाऱ्या त्रिकोणीय मालिकेसाठी त्याची अंडर १९ भारतीय संघात त्याची निवड झाली आहे.

कौशल तांबेची निवड झाल्यामुळे ओतुकरांच्या माना उंचवल्या असून त्याचा खेळ पाहण्यासाठी उत्साहित झाले आहे. कौशल आपल्या जबरदस्त खेळीने सर्वांची मने जिंकून घेईल, अशी आशा ओतुरकरांनी व्यक्त केली आहे.

त्रिकोणी मालिकेत जर त्याने हैराण करणारी कामगिरी केली, तर त्याच्यासाठी पुढच्या महिन्यात युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक आणि विश्वचषकाच्या संघीचे दरवाजे उघडतील, असे म्हटले जात आहे. असे झाले तर ते सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे.

त्यानंतर कौशलचे काका आणि बाजार समितीचे संचालक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच त्याने विनू मांकड ट्रॉफीमध्ये २शतके आणि चॅलेजर्स ट्रॉफी फायनलमध्ये भारत डीचे प्रतिनिधित्व करताना त्याने ९७ धावा केल्या होत्या. तो सध्या भारतामध्ये गोलंदाजीत दुसऱ्या आणि फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर आहे.

चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक म्हणजेच ६४ बॉलमध्ये त्याने शतक मारले होते. त्यामुळे तो भारतात पहिल्या स्थानावर आला आहे. तो पुण्यातल्या एसपी कॉलेजचा बी ए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. गेल्या सात वर्षांपासून तो महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

कौशल गेल्या १० वर्षांपासून पुण्यातील कॅडन्स क्रिकेट अकादमीमधुन खेळत आहे. त्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून सर्वात आशादायी खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. त्याची आता भारतीय संघात निवड झाल्यामुळे सगळीकडून त्याच्यावर कौतूकांचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
किळसवाणे! ‘या’ प्रसिद्ध गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याच्या तोंडावर केली लघुशंका, नंतर म्हणाली..
अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’ने बंटी और बबली २ ला टाकले मागे, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
पाया पडण्यासाठी मैदानात आलेल्या चाहत्याला रोहित शर्माने सांगितली ‘ही’ गोष्ट; वाचून अभिमान वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.