पाणी प्यायला गेलेल्या हत्तीमध्ये आणि मगरीमध्ये जुंपली, पहा थरारक भांडणाचा व्हिडिओ

मुंबई। सोशल मीडियात सध्या प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय ठरत आहेत. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात.

तर काही व्हिडिओ एवढे थरारक असतात की, अनेकांना व्हिडिओ पाहून धक्काच बसतो. हे मजेदार व्हिडिओ लोक त्यांच्या फोन आणि लॅपटॉपवर सेव्ह करतात. कारण हे व्हिडीओ एकदा पाहून आपले मन भरत नाही.

मात्र सध्या एक असा थरारक व्हिडिओ शेअर झालाय. ज्यात हत्तीच्या कळपावर एका मगरीने हल्ला केला आहे व ती त्याला पाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.

हा व्हिडिओ आयआरएस ऑफिसर अंकुर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीचा कळप दिसतोय. यामध्ये काही छोटे तर काही मोठे हत्ती आहेत. हे सर्व हत्ती एका नदीच्या काठावर जाऊन पाणी पित आहेत.

मात्र, याच वेळी या हत्तींपैकी एका छोट्या हत्तीवर पाण्यातील मगरीने हल्ला केला आहे. या मगरीने आपल्या जबड्यामध्ये हत्तीला पकडले आहे. मगर हत्तीची सोंड आपल्या जबड्यामध्ये पकडून त्याला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हत्ती आपली सोंड सोडवण्याचा प्रयत्न आहे.

एक मोठा आणि समजूतदार हत्ती मगरीकडे धावून गेल्याचेही आपल्याला दिसतेय. या मोठ्या हत्तीने छोट्या हत्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न शेवटी यशस्वी झाला असून छोटा हत्ती मगरीच्या तावडीतून सुटला आहे. हा व्हिडिओ पाहून सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व आतापर्यत अनेकांनी कमेंट्स करत हळहळ व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या
लग्नात जेवणामध्ये माशाचं डोकं खायला न वाढल्यामुळे तुफान हाणामारी; ११ जण गंभीर जखमी
धक्कादायक! टॉपलेस फोटोमुळे ट्रोल झालेल्या पॉर्न स्टारचा संशयास्पद मृत्यू
‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’, करीना कपूर खानला नेटकऱ्यांचा विरोध
धक्कादायक! टॉपलेस फोटोमुळे ट्रोल झालेल्या पॉर्न स्टारचा संशयास्पद मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.