जुही चावलाने आमिर खानला किस करू द्यावा म्हणून डायरेक्टरने लढवली होती ‘ही’ शक्कल

आमिर खानला फिल्म इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट बोलले जाते. आमिरला इंडस्ट्रीमध्ये ३३ वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यामूळे त्याचा चाहता वर्ग खुप आनंदी आहे. १९८८ मध्ये ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातूम आमिरने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि आमिर स्टार बनला.

आमिरने जुही चावलासोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. गेल्या ३३ वर्षांमध्ये आमिरने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्याच्या पहील्या चित्रपटाचा एक किस्सा सांगणार आहोत.

आमिरने १९८८ जुही चावलासोबत कयामत से कयामत तक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाच्या यशाने सगळेजण खुप आनंदी झाले होते. आमिर आणि जुही तर रातोरात सुपरस्टार बनले होते.

चित्रपटातील गाणी देखील ब्लॉकब्लास्टर झाली होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकांना खुप आवडतात. हम लोग अकेले है गाण्याच्या शुटींग वेळीचा हा किस्सा आहे. गाण्याची शुटींग एका जंगलात होत होती. या गाण्यात एका सीनमध्ये जुही चावला आमिरला गालावर आणि कपाळावर किस करते.

हा सीन शुट करणे सोपे काम नव्हते. कारण सुरुवातीला जुहीने आमिरला किस करायला नकार दिला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक मंसूर खानने या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, ‘मी जुहीला सीन समजावून सांगितला आणि तिला सांगितले की, या सीनमध्ये तिला आमिरला गालावर आणि डोक्यावर किस करायचे आहे. हे ऐकल्यानंतर ती काहीही बोलली नाही’.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘सुरुवातीला ती काहीही बोलली नाही. त्यानंतर तिने हा सीन शुट करायला नकार दिला. तिने आमिरला किस करायला नकार दिला. हे ऐकल्यानंतर मला टेन्शन आले. कारण हा सीन खुप महत्वाचा होता. तिने नकार दिल्यामूळे सगळ्यांची झोप उडाली होती. आम्ही शुटींग थांबवली होती’.

याबद्दल जुहीला विचारल्यनंतर ती हसली. ती म्हणाली की, ‘त्यावेळी मी खुप लहान होते. मला काहीही कळत नव्हते आणि त्याकाळी किस करणे छोटी गोष्ट नव्हती. म्हणून मी नकार दिला होती. पण नंतर मी होकार दिला आणि शुटींग सुरु झाली’.

आमिर खान आणि जुही चावला खुप चांगले मित्र होते. चित्रपटाच्या शुटींग वेळी दोघांमध्ये खुप चांगली बॉन्डिंग झाली होती. दोघांच्या घट्ट मैत्रीमूळे त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले. पण नंतर मात्र त्यांची मैत्री तुटली आणि त्यांनी एकत्र चित्रपट करणे बंदल केले.

महत्वाच्या बातम्या –
कंगणा राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीला झाला आनंद; म्हणाली…
एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घेणार घटस्फोट? अभिषेकने केला ‘हा’ मोठा खुलासा
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने सख्या भावासोबत केला होता फिल्मी पडद्यावर रोमान्स; लोकांनी दिल्या शिव्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.