पैशांसाठी जुही चावलाने केले होते जय मेहतासोबत लग्न?

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कलाकरांना त्यांच्या आयूष्यात अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. अनेक वेळा त्यांना त्यांच्या फिल्मी करिअरमूळे वैयक्तिक आयूष्यातील अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागते. त्याच्याशिवाय त्यांना बॉलीवूडमध्ये टिकून राहता येत नाही.

असेच काही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलासोबत झाले होतो. जुहीला तिच्या लग्नाबद्दल सहा वर्ष सर्वांपासून लपवून ठेवावे लागले. पण त्यानंतर तिने हे सत्य सर्वांना सांगितले. हे सत्य लोकांसमोर आल्यानंतर जुहीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

आजही ५३ वर्षांची जुही नवऱ्यासोबत मीडियासमोर येते. त्यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करण्यासाठी लागतो. ५३ व्या वर्षी देखील जुही खुप फिट आणि सुंदर दिसते. तर जय मेहता म्हतारे दिसतात. त्यांच्याकडे बघून त्यांचे वय समजते.

त्यामुळे अनेकदा जुहीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. लोकं काहीही म्हणाले तरी जुहीला काही फरक पडत नाही. ती ट्रोलिंगला घाबरत नाही. पण एक काळ असा होता ज्यावेळी तिला या गोष्टीचा फरक पडत होता. ती ट्रोलिंगला वैतागली होती.

जुही चावला ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. तिचा ‘कयामत से कयामत तक’ चित्रपट चांगलाच हिट झाला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहीले नाही. ती एका पेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम करत होती.

जुहीला तिच्या अभिनय कौशल्याने यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले होते. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. ती इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांसोबत काम करत होती. त्यामूळे तिला हिंदीसोबतच अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम करत होती.

१९९५ मध्ये जुही चावलाने बिजनेस मॅन जय मेहतासोबत लग्न केले होते. पण तिने तिच्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. २००० मध्ये ती गर्भवती होती. त्यावेळी तिने ही गोष्ट सर्वांना सांगितली होती. त्यावेळी तिच्या लग्नाबद्दल समजल्यानंतर सर्वांना खुप मोठा धक्का बसला होता.

लग्नाची बातमी समोर आल्यानंतर जुहीचे तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो सगळीकडे छापून येत होते. फोटो पाहून लोकांना धक्का बसला होता. कारण जय मेहता जुही पेक्षा खुप मोठे दिसतात. दोघांमध्ये वयाचे अंतर खुप जास्त होते.

जय मेहता भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. त्यांचा बिजनेस भारतासोबतच भारता बाहेर देखील खुप प्रसिद्ध होता. १९९० मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर करोडोंच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या जय मेहताचे हृदय जुहीवर आले होते.

दोघांनी लग्न केले. पण लोकांचे म्हणणे होते की, ‘जुही चावलाने पैशांसाठी जय मेहतासोबत लग्न केले होते. तिने पैशांसमोर वय देखील बघितले नाही. हे ऐकल्यानंतर जुहीला खूप त्रास व्हायचा, ती रडायची.
काही दिवसांनी मात्र तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि आपल्या आयुष्यात आनंदी राहू लागली.

आज जुही चावला चित्रपटांपासून दुर असते. लाईमलाईटपासून दुर जुही शेती करत आहे. मुंबईच्या बाहेर तिचे फार्म हाऊस आहेत. ज्यात ती शेती करते. शेतीलच तिने व्यवसाय बनवला आहे. ती वर्षाला लाखो रुपये कमावते.

महत्वाच्या बातम्या –
या अभिनेत्रीमुळे करण जोहर राहिला अविवाहीत, आता ती आहे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी
…म्हणून मीनाषी शेषाद्रीने ‘दामिनी’ चित्रपटानंतर एकही चित्रपट साईन केला नाही
९० च्या दशकात ‘या’ अभिनेत्रीचा २० सेकंदाचा बोल्ड सीन पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी; ब्लॅकमध्ये तिकीटं केले खरेदी
विराट आणि अनुष्काने १६ कोटींची मदत करत चिमुरडीचे वाचवले प्राण; जाणून घ्या पुर्ण किस्सा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.