जुही चावला ९० च्या दशकातील सर्वात सुंदर आणि चुलबूली अभिनेत्री आहे. तिने तिच्या सुंदरतेने तरुणांची हृदय चोरली आहेत. आजही ती लाखो तरुणांच्या मनावर राज्य करते. तिने अनेक वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य केले आहे.
जुही चावलाने १९८४ मध्ये मिस इंडीयाचा ताज जिंकला होता. त्यानंतर १९८६ मध्ये ‘सलतनत’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्य केला होता. पण तिला खरी ओळख १९८९ मध्ये रिलीज झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातून मिळाली होती.
त्यानंतर अनेक वर्ष ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य करत होती. जुहीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही लाखो तरुण तिच्या सौंदर्यावर घायाळ आहेत. ती आज चित्रपटांपासून लांब असली तरी नेहमी चर्चेत असते.
जुहीने बिजनेस मॅन जय मेहतासोबत लग्न केले होते. तिच्या लग्नामूळे देखील ती खुप चर्चेत होती. कारण तिने सहा वर्ष तिच्या लग्नाबद्दल सर्वांकडून लपवून ठेवले होते. गरोदर असताना तिने लग्नाबद्दलचा खुलासा केला होता. जुहीला दोन मुलं आहेत.
जुही तिच्या नवऱ्यासोबत मुंबईच्या मालाबार भागात राहते. त्या भागात जुहीचे नऊ मजली घर आहे. या घराची किंमत २०० करोड आहे. सर्व सोयी सुविधा या घरात उपलब्ध आहेत. म्हणूनच या घराची किंमत एवढी जास्त आहे.
जुहीचे पती भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंपैकी एक आहेत. या दोघांची एकूण प्रॉपर्टी २३०० करोडपेक्षा अधिक आहे. तिच्या घरातील सजावट करोडोंची आहे. तिने बाहेर देशातून गोष्टी आणून घराची सजावट केली आहे. या सजावटीसाठी तिने ९८ करोड रुपये खर्च केले होते.
जुहीच्या घरातीला सर्वात मोठे आकर्षण आहे तिच्या घरातील टेरेस. टेरेलसच्या सजावटीसाठी देखील तिने करोडो रुपये खर्च केले आहेत. तिच्या घरातील चहाच्या सेटची किंमत २ करोड आहे. त्यामूळे तिचे लाईफस्टाइल अंबानीसारखेच अलिशान आहे. ती देखील तिच्या पतीसोबत त्यांचा व्यवसाय सांभाळते.
त्यासोबतच जुहीचे दोन फार्म हाऊस देखील आहेत. बाहेर देशातही तिचे बंगले आहेत. करोडोच्या गाड्यांमधून जुही रोज प्रवास करते. तिचे दोन्ही मुलं लंडनला शिक्षणासाठी राहतात. म्हणून त्यांचे लंडनमध्ये देखील अलिशान घरं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
८० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री पुनम ढिल्लोन अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब का झाल्या ?
अभिनयासोबतच ‘हा’ व्यवसाय करते बिपाशा बासू; वर्षाला कमावते करोडो रुपये
आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात
श्रुती मराठेचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता; झी मराठीच्या ‘या’ मालिकेत साकारत आहे मुख्य भुमिका