चित्रपटातील बोल्ड सीन्सवर कैची मारल्यामूळे यश चोप्रावर भडकली होती जुही चावला

आजकाल बॉलीवूड चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स असणे यात काही नवीन नाही. अनेक चित्रपटांमध्ये बिंधास्तपणे बोल्ड सीन्स दाखवले जातात. पण एक काळ असा होता ज्यावेळी बॉलीवूडमध्ये बोल्ड सीन्सवर बंदी होती. अशा काळातही काही अभिनेत्री होत्या ज्यांनी बोल्ड सीन्स दिले आणि त्यांना मोठ्या पडद्यावर पाहीले.

ज्या काळात अभिनेत्री बोल्ड सीन्स द्यायला नकार द्यायच्या त्या काळात अनेक अभिनेत्री बोल्ड सीन्स देत होत्या. एक अभिनेत्री तर अशी होती जिने बोल्ड सीन्स दिले आणि चित्रपटामधून ते कट करण्यात आले म्हणून ती दिग्दर्शकासोबत भांडली होती. ही अभिनेत्री होती जुही चावला आणि दिग्दर्शक होते यश चोप्रा. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

हा किस्सा १९८८ चा. दिग्दर्शक यश चोप्रा अभिनेत्री श्रीदेवीसोबत ‘चांदनी’ चित्रपटाची शुटींग करत होते. श्रीदेवीसोबतच या चित्रपटामध्ये विनोद खन्ना आणि रुषी कपूर देखील काम करत होते. चित्रपटात अजून एका अभिनेत्रीची गरज होती. त्यामूळे यश चोप्राने बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना विचारले.

माधूरी दिक्षितपासून मीनाषी शेषाद्रीपर्यंत सर्वांना त्यांनी चित्रपटाची ऑफर दिली. पण श्रीदेवीच्या स्टारडम पुढे कोणतीही अभिनेत्री काम करायला तयार नव्हती. त्या सर्वांना श्रीदेवीच्या स्टारडमची भीती वाटत होती. शेवटी यश चोप्राने जुही चावलाला या चित्रपटाची ऑफर दिली.

सुरुवातीला जुही चावलाने देखील ही भुमिका करायला नकार दिला. पण यश चोप्राने तिला पुढच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून घेण्याची लालच दिली आणि तिने चित्रपटाला होकार दिला. जुहीला माहीती होते की, चित्रपटात श्रीदेवीसमोर टिकून राहणे सोपे नाही.

श्रीदेवीला टक्कर देण्यासाठी जुहीने चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले होते. ज्यामूळे लोकांचे लक्ष तिच्याकडे जाईल. पण दिग्दर्शक यश चोप्रा मात्र श्रीदेवीच्या सुंदरतेमध्ये रंगून गेले होते. श्रीदेवीसमोर ते जुहीला विसरुन गेले. त्यांना चित्रपटात फक्त श्रीदेवीची सुंदरता दाखवायची होती.

त्यासाठी यश चोप्राने चित्रपटातील जुही चावलाचे सगळे महत्वाचे सीन कट केले. त्यांनी खुप जुहीचे बेडरुम सीन देखील कट केले. जुही चावलाचे काही मोजके सीन्स त्यांनी ठेवले. ही गोष्ट जुहीला माहीती नव्हती. चित्रपट पुर्ण झाल्यानंतर जुहीने चित्रपट पाहील्यानंतर तिला धक्का बसला.

कारण यश चोप्राने तिचे सगळे महत्वाचे सीन कट केले होते. त्यांनी तिच्या बेडरुम सीनवर देखील कैची मारली होती. ज्यामूळे जुही चिडली. तिने यश चोप्राकडे या गोष्टीची तक्रार केले. दोघांमध्ये या गोष्टीवरुन वादविवाद झाले होते. पण चित्रपटाच्या यशापुढे यश चोप्राने जुहीकडे लक्ष दिले नाही.

श्रीदेवीला टक्कर देण्यासाठी जुहीने केलेली सगळी मेहनत वाया गेली होती. त्यामूळे ती दुखी झाली होती. पण यश चोप्राने तिला दुखी होऊ दिले नाही त्यांनी जुहीला त्यांच्या दुसऱ्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून घेतले. ‘डर’ चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर यश चोप्रा आणि जुहीचे वाद कमी झाले.

महत्वाच्या बातम्या –
मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण
…म्हणून चार दिवस मी घरातून बाहेर नव्हते पडले; राधिका आपटेने सांगितला न्युड व्हिडिओचा अनुभव
लग्नानंतर वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांना सोनालीने झाप झाप झापले, म्हणाली..
…म्हणून मनीषा कोईरालाने सुपरहिट चित्रपट ‘जुबेदा’ला दिला होता नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.