जुही चावलाने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘तेव्हा’ मी सलमानला रिजेक्ट केले होते

९० च्या दशकात एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री जुही चावलाने अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्यातल्या त्यात आमिर खान आणि शाहरूख खानसोबत तिने अनेक हिट सिनेमे केले आहेत. पण अनेकांना हा प्रश्न पडतो की जुहीने सलमान खानसोबत एकही सिनेमा का केला नाही?

तर याचे कारण आता समोर आले नाही. एका शोमध्ये जुहीने हा खुलासा केला होता. तिने स्वता शाहरूख खानला लग्नासाठी नकार दिला होता. एंटरटेंनमेंट की रात या शोमध्ये जुहीने हा खुलासा केला होता. एवढेच नाही तर या शोमध्ये तिने सलमान, शाहरूखची जबरदस्त खिल्ली उडवली होती.

सलमानसोबत तू एकही सिनेमा का केला नाहीस असा प्रश्न जेव्हा तिला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की मी सलमानला रिजेक्ट केले होते. पुढे सलमान खुप मोठा सुपरस्टार बनला. नंतर त्याने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.

मी ज्यांनाही रिजेक्ट केलंय ते सगळे सुपरस्टार बनलेत असेही जुही चावला म्हणाली. शाहरूखबद्दल बोलताना जुही म्हणाली होती की, शाहरूख फौजीमधला एक मुलगा हिरो असल्याचे निर्मात्यांनी मला सांगितले होते. तो अगदी आमिरसारखा दिसतो, तो असा आहे, तो तसा आहे असे निर्मात्यांनी मला सांगितले होते.

मी सेटवर गेले तेव्हा एक सडपातळ मुलगा माझ्यासमोर उभा होता. डोळ्यांपर्यंत केस आणि त्याचा तो अवतार पाहून हा आणि आमिर खान? हा कुठल्या एंगलने आमिर खान दिसतो असा प्रश्न मला पडला होता. पण मी सिनेमा साईन केला होता त्यामुळे मला त्याच्यासोबत काम करावे लागले असे जुही म्हणाली.

मी त्याच्यासोबत सिनेमा केला आणि तो सुपरस्टार झाला. तो सिनेमा होता राजू बन गया जेंटलमॅन. दिल तो पागल है बाबत बोलताना जुही चावला म्हणाली की, दिल तो पागल है सिनेमा हा आधी मला ऑफर झाला होता. पण मी तो रिजेक्ट केला होता.

कारण त्यांनी मला माधुरीचा नाही तर करिष्माचा रोल ऑफर केला होता. मी त्यांना नकार दिला. माधुरी लीड रोलमध्ये आणि मी सेकंड रोलमध्ये हे मला मान्य नव्हते. म्हणून मी तो सिनेमा नाकारला. त्यानंतर माधुरी आणि करिष्मा सुपरस्टार बनल्या असे जुही म्हणाली. असे म्हणत तिने सलमान, शाहरूख, करिष्मा, माधुरी या सगळ्यांची खिल्ली उडवली.

महत्वाच्या बातम्या
४० दिवसानंतर पण उद्धव ठाकरेंची खुर्ची स्थिर; आचार्य भोसलेंची भविष्यवाणी विरली हवेतच
शाहीद अफरीदीची सुंदर मुलगी अडकणार लग्नबेडीत, या प्रसिद्ध क्रिकेटरसोबत ठरले लग्न
कोरोना झाला तरी चालेल पण लस नको, लसीकरणाला घाबरून गावकऱ्यांनी टाकल्या नदीत उड्या
आनंद महिंद्रांनी शेअर केला एका आगाऊ बाळाचा व्हिडिओ; म्हणाले, हे बाळ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.