कोर्टात अर्णब गोस्वामींच वागणं पाहून न्यायाधीश भडकले; म्हणाले..

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबईच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव आल्याने त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

जवळपास १ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी रायगड पोलिसांवर आरोप केला आहे की, पोलिसांनी मला मारहाण केली. त्यानंतर न्यायाधीशांनी वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर पुन्हा त्यांची सुनवाई झाली. मग अर्णब गोस्वामी यांनी पुन्हा आरोप केला की, मला कोर्टाच्या बाहेर पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर ते काही हातवारे करू लागले, इशारे करू लागले.

त्यांचे हे हातवारे पाहून न्यायाधीश भडकले आणि त्यांनी अर्णब गोस्वामी यांना खडसावले तुम्ही नीट उभे राहा हातवारे करू नका. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी आपलं वागणं बदललं आणि ते शांत बसून सुनवाई ऐकत होते.

मारहाण केल्याचा अर्णब गोस्वामी यांचा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्यांची रिमांड अर्जावर सुनावणी सुरू झाली. यावेळी कोर्टाने तीन निरीक्षणे नोंदवली. अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीत कोठडी रात्रही जेलमध्येच.

अर्णब गोस्वामी यांचा अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाशी संबंध आहे का? आणि अर्णब व ठाकरे सरकारमधील संघर्षाच्या मुख्य कारणे. ही तीन निरीक्षणे कोर्टाने नोंदवली. दरम्यान, न्यायालयाने अर्णब यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि पुढे न्यायालय काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.