Share

रतन टाटांना भारतरत्न देण्याच्या याचिकेवर जज संतापले, म्हणाले, आम्ही या प्रकरणात कोणताही…

ratan tata

दिल्ली उच्च न्यायालयाने(High Court) गुरुवारी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. आम्ही या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही, असे याचिका फेटाळून लावताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हंटले आहे.(Judge angry over Bharat Ratna petition to Ratan Tata)

उद्योगपती रतन टाटा यांना देशसेवेसाठी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. राकेश नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनादरम्यान केलेल्या सामाजिक योगदानाचा देखील उल्लेख करण्यात आला होता.

या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे. “कोणत्याही व्यक्तीला भारतरत्न देण्याचे निर्देश अधिकार्‍यांना देणे हे न्यायालयाचे काम नाही”, असे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. “ही कोणत्या प्रकारची याचिका आहे? हे न्यायालय निर्देश देण्यासाठी आहे का?”, असे म्हणत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाला या मागणीवर विचार करण्याची विनंती केली. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी म्हणाले की, “जा आणि सरकारला यासाठी विनंती करा. न्यायालयीन कारवाई करण्याचा प्रश्नच कुठे येतो? पाहिजे तर सरकारला याबाबत विनंती करा.”

आम्ही कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. या प्रकरणात आम्ही काहीही करू शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हंटले आहे. या याचिकेत याचिकाकर्त्याने रतन टाटांनी केलेल्या सामाजिक कामाचा उल्लेख करत म्हंटले की, “मार्च 2020 मध्ये, रतन टाटा यांनी कोविड महामारीचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टमार्फत 500 कोटी रुपये दिले.”

“2020 या आर्थिक वर्षात टाटा समूहाच्या 30 कंपन्यांचा महसूल 106 अब्ज डॉलर होता. “टाटा समूहाच्या 30 कंपन्या 100 हून अधिक कंपन्यांमध्ये सहभागी आहेत. तसेच एकत्रितपणे 7.5 लाखांहून अधिक लोकांना टाटा समूह रोजगार देतात”, असे याचिकाकर्त्याने म्हंटले आहे. यापूर्वी देखील रतन टाटांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही मागणी करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :-
आता हसन मुश्रीफ यांचा नंबर? किरीट सोमय्यांचे ट्विट चर्चेत, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
KGF मधील या अभिनेत्याचे वडील अजूनही करतात ड्रायव्हरची नोकरी, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक
लाचखोरांकडून जप्त करण्यात आलेल्या नोटांचे काय करण्यात येते? ऐकून तुमचं डोकं चक्रावेल

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now