..त्यामुळे मुलींनी राहुल गांधीपासून सावध राहावं, माजी खासदाराचे अपमानजनक वक्तव्य

केरळ विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे मोठ्या जोमाने केरळमध्ये प्रचार सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष प्रचारात आपली ताकद दाखवत आहेत. इडुक्कीमध्ये निवडणुक प्रचाराच्यावेळी माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे.

एका सभेत असताना ते बोलत होते. यावेळी त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, राहुल गांधींपासून मुलींनी सावध राहिलं पाहिजे. राहुल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फक्त मुलींच्या कॉलेजमध्ये जातात. तिथे ते महिलांना स्नायू कसे वाकवायचे? हे शिकवत आहेत.

काँग्रेस नेता हे एक अविवाहित संकट आहे. राहुल हे मुलींना हे कसं वाकायचं हे शिकवत आहेत. पण कृपया मुलींनी त्यांच्यासमोर सरळ उभं राहावं. त्यांनी अजून लग्न केलेलं नाही. अशी खळबळजनक टीका जॉर्ज यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

त्यांच्या या टीकेनंतर अनेक नेत्यांनी याचा विरोध केला आहे. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी हे वक्तव्य महिला व राहुल गांधींच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. जॉर्ज यांच्या विरोधात तक्रार दाखल केली जाईल असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधींनी मागील आठवड्यात कोचिन येथील एका महिला कॉलेजला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मुलींना जपानी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिले होते. तसेच तामिळनाडू दौऱ्याच्या वेळीही त्यांनी एका विद्यार्थीनीला पुश अप चॅलेंज दिले होते ज्याचा व्हिडीओ खुप व्हायरल झाला होता.

महत्वाच्या बातम्या
‘आगे आगे देखो, होता है क्या,’ शरद पवार-अमित शाह भेटीवर भाजप नेत्याचे वक्तव्य
फिल्मी आणि खऱ्या पोलिसांमध्ये जमिन आस्मानचा फरक असतो- उद्धव ठाकरे
दारूच्या नशेतील अजय देवगनाला दिल्लीत मारहाण? स्वता अजयनेच केला खुलासा; म्हणाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.