प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन; कोरोनाच्या उपचारादरम्यान आला हृदविकाराचा झटका

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या संकटात अनेक लोकांचा मृत्युही होत आहे. अशात अनेक कलाकार, पत्रकार कोरोनाच्या विळख्यात अडकत असून त्यांचा कोरोनामुळे मृत्यु होत आहे.

अशात आता प्रसिद्ध न्युज अँकर रोहित सरदाना यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर कोरोनावरचे उपचार सुरु असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.

सरदाना हे आजतक या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार होते. तसेच ते एक उत्तम अँकर सुद्धा होते. आज दुपारीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. त्यांच्या कुटुंबात आता त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत.

रोहित सरदाना यांना काही दिवसांपुर्वीच कोरोनाची लागण झालेली होती. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते आणि ते कोरोनातून बरे होत होते. पण अचानक त्यांची प्रकृती बिघल्याने त्यांना गुरुवारी रात्री नोएडाच्या मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली आहे.

पत्रकारीतेच्या क्षेत्रात रोहित सरदाना यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी १५ वर्षांपेक्षा जास्त पत्रकारीतेच्या क्षेत्रात काम केले होते. त्यांनी आतापर्यंत ई टिव्ही, सहारा समय, झी न्युज आणि आजतक या वृत्तावाहिन्यांमध्ये काम केले होते. आपल्या आवाजाच्या जोरावर त्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केली होती.

आजतकमध्ये रोहित सरदाना दंगल या प्राईम टाईम शोमध्ये अँकर होते. त्याआधी ते झी न्युजच्या पॉपुलर शोमध्येही अँकर होते. आपल्या कार्यक्रमात रोहित सरदाना अनेकदा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांची बोलती बंद करुन टाकायचे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन
डॉक्टर नाही देवचं! पीपीई किट काढून डॉक्टरने शेअर केला फोटो; अवस्था पाहून डोळे पाणावतील
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘या’ कलाकाराचे झाले निधन, कलाविश्वात हळहळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.