पत्रकार बनला देवमाणूस! ‘त्या’ चिमुकल्या बाळाचा पाय कापावा लागणार होता पण…

अंबरनाथ | देव तारी त्याला कोण मारी! असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथमध्ये एका आईसाठी एक पत्रकार देवासारखाच धावून आला आहे. त्यामुळे या आईच्या बाळाला दुसरा जन्म मिळाला असल्याची भावना आईने व्यक्त केली आहे.

गोंडस बाळाला जन्म दिलेल्या आई मनीषा रोकडे या अंबरानाथच्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीत राहतात. पंधरा डिसेंबरला त्यांनी मुलाला जन्म दिला आहे. दरम्यान सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या. मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर बारा दिवसातच बाळाच्या उजव्या पायावर गाठ आली.

बाळाच्या पायाला गाठ आल्याचे समजताच आई-वडीलांनी बाळाला उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याठिकाणी बाळाचा पाय बरा झाला नाही.

उपचार करुनही बाळाचा पाय बरा होत नव्हता. अखेर इंन्फेक्शन वाढल्याने डॉक्टरांनी बाळाचा तो उजवा पाय गुडघ्यापासून कापावा लागेल असे सांगितले. यानंतर बाळाच्या आईला मोठा धक्का बसला. आई झाल्याचा आनंद होता तोच डॉक्टरांनी बाळाचा पाय कापण्याचा सल्ला दिला होता. यामुळे त्या माऊलीवर मोठा मानसिक आघात झाला.

डॉक्टरांनी शहरातील मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. परंतु बाळाची आई मनीषा आणि वडिल शंकर यांची आर्थिक परिस्थिती हालाकिची. त्यांचे हातावर पोट त्यांना बाळाच्या या ऑपरेशन खर्च झेपणारा नव्हता. तसेच लवकर ऑपरेशन न झाल्यास बाळावर संकट वाढण्याची भीती होतीच.

अशात बाळासाठी देवाचे देवदूत म्हणून पत्रकार पंकज पाटील हे समोर आले. त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी ऑपरेशनची पूर्ण जबाबदारी घेतली. पत्रकार पंकज पाटील यांनी इतर मोठ्या वाडिया आणि केईएम सारख्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. परंतु बाळाचा पाय कापावा लागेल हेच उत्तर त्यांना मिळाले.

जास्त वेळ घालवला तर बाळाच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. यामुळे त्यांनी नाईलाजाने बाळाला वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी बाळाचे ऑपरेशन करण्यात आले. सुदैवाने बाळाच पाय पुर्ण कापावा लागला नाही. परंतु पायाची बोट कापावी लागली.

यानंतर बाळावर आणखी काही उपचार करण्यात आले. पायला प्लॉस्टिक सर्जरी केली गेली. यानंतर नुकतेच हे बाळ घरी आले आहे. वेदना सहन करणारे बाळ आता हसू आणि खेळू लागले आहे. बाळाचा चेहरा पाहून आई भावूक झाली होते आहे. भावूक आईने या बाळाचे नाव पत्रकार पंकज पाटील यांनाच ठेवायला सांगितले.

पत्रकार पंकज पाटील हे या बाळाची दुसरी आई आहेत. त्यांनी या बाळाला नव्याने जन्म दिला असल्याच्या भावाना बाळाची आई मनीषा यांच्या आहेत. पंकज यांनी या बाळाला शिवांश असे नाव दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
पूजा चव्हाण प्रकरणात ‘गबरु’ची एन्ट्री; पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट
संजय राठोडांवर शरद पवार प्रचंड नाराज; राजीनामा द्यावा लागणार?
मोठी ऑफर! ‘या’ नामांकित कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर दीड लाखांपर्यंतचा डिस्काऊंट
‘तीरा’च्या इंजक्शनसाठी सोळा कोटी रुपये जमले पण आता सरकारकडून हवीय ‘ही’ मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.