Share

“ब्राह्मणांना जाती निर्मूलन करण्यास सांगणे म्हणजे अटल दारूड्यांना दारूमुक्ती मोहिमेचे प्रमुख बनविणे”

अभिनेते शरद पोंक्षे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच एका कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी जातीयवादावर भाष्य केलं आहे. जात नष्ट करण्यासाठी ब्राम्हणांनी एकत्र येत पुढाकार घ्यायला हवा”, असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं होतं. यावरून प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांना खोचक टोला लगावला आहे.(journalist nikhil wagle statement on marathi actor sharad ponkshe )

ब्राह्मणांना जाती निर्मूलन करण्यास सांगणे म्हणजे अटल दारूड्यांना दारूमुक्ती मोहिमेचे प्रमुख बनविण्यासारखे आहे, अशा शब्दांत पत्रकार निखिल वागळे(Nikhil Wagle) यांनी शरद पोंक्षे यांना टोला लगावला आहे. पत्रकार निखिल वागळे यांनी यासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून पत्रकार निखिल वागळे यांनी नाव न घेता शरद पोंक्षेंवर टीका केली आहे.

“ब्राह्मणांना जाती निर्मूलन करण्यास सांगणे म्हणजे अटल दारूड्यांना दारूमुक्ती मोहिमेचे प्रमुख बनविण्यासारखे आहे. किती खोटारडे आहात!”, अशा आशयाची पोस्ट प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर अद्याप अभिनेते शरद पोंक्षे यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

अभिनेते शरद पोंक्षे यांना नुकताच ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलाखत देखील घेण्यात आली. या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, “जात संपविण्यासाठी मी पंधरा वर्षे व्याख्याने देत आहे. जात संपली पाहिजे; मनुष्य हा धर्म टिकला पाहिजे”, असे अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितले आहे.

“जात संपणे अशक्य आहे. म्हणून त्यासाठी प्रयत्न करायलाच नको असे म्हणून चालणार नाही. जात संपविण्याच्या कामात आपल्याला कधीतरी यश मिळेल. आपले राज्य, देश कधी तरी जातमुक्त होईल”, असे देखील अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितले. या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी जातीवरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली.

अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, “जातीयवाद्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केले आहे. ते स्वच्छ करण्यासाठी ब्राम्हणांनीच पुढाकार घ्यायला हवा. फुले, शाहू, आंबेडकरांनीही समाजसुधारणा केली आहे. त्यात ब्राह्मणांचाही वाटा मोठा आहे. एकच हिंदू जात राहायला हवी. जात संपवण्यासाठी ब्राम्हणांनी एकत्र आले पाहिजे”, असे अभिनेते शरद पोंक्षे यांनी कार्यक्रमात सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
माणसं जमा करायला अजूनही राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतोय का? मनसेचा शिवसेनेला टोला
अंडरग्राऊंड झालेले गणेश नाईक प्रकटले, लैगिंक छळाच्या आरोपांवर म्हणाले, काहींना राजकारणात…
असंच जर होत राहिलं तर आपली स्थिती श्रीलंकेपेक्षा वाईट होईल, मेहबूबा मुफ्ती भाजपवर कडाडल्या

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now