Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

रेखा जरे ह.त्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; ज्येष्ठ पत्रकारानेच दिली सुपारी!

Dhanashri Rout by Dhanashri Rout
December 4, 2020
in क्राईम, इतर, ताज्या बातम्या, राजकारण, राज्य
0
रेखा जरे ह.त्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; ज्येष्ठ पत्रकारानेच दिली सुपारी!

मुंबई | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची भर रस्त्यात हत्या झाली. यामुळे अहमदनगरमध्ये खळबळ उडाली होती. रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आता सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

रेखा जरे यांची हत्या करण्याची सुपारी ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे यांनी दिली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी मिळून जरे यांना मारण्याची सुपारी दिली होती.

दरम्यान, आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी आरोपी आदित्य चोळके यास सुपारी दिली. त्यानंतर चोळके याने फिरोज शेख आणि ज्ञानेश्‍वर शिंदे यांना ही सुपारी दिली. याचबरोबर सुपारीमधील ६ लाख २० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनीच ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. बोठे फरारी असून अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. घराची झडती घेतली असून, काही वस्तू जप्त करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले

काय आहे प्रकरण…
अहमदनगर जिल्ह्यातल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पारनेर तालुक्यातील जातेगाव इथल्या घाटात हल्लेखोरांनी रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली होती.

घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. रेखा जरे यांच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपची झाली नाचक्की; भाजपचे आयटी सेल प्रमुखांचे ट्विट फेक
आता फक्त १२१ रुपये भरा आणि मुलीच्या लग्नाला मिळवा २७ लाख रुपये, जाणून घ्या..
अमिताभ बच्चनने केली त्यांच्या २८०० कोटी रुपयांच्या संपत्तीच्या वारसदाराची घोषणा

Tags: ncprekha jareअहमदनगरपत्रकार बाळ ज. बोठेराष्ट्रवादी
Previous Post

भाजपची झाली नाचक्की; भाजपचे आयटी सेल प्रमुखांचे ट्विट फेक

Next Post

विधानपरिषदेतील दारूण पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात; हिंमत असेल तर…

Next Post
‘तुम्ही फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणता ते चालते का?’

विधानपरिषदेतील दारूण पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात; हिंमत असेल तर...

ताज्या बातम्या

गुजरात सरकारनं केलं ड्रॅगन फ्रूटचं बारसं; नाव वाचून बसेल धक्का

भाजपानं शहरांनंतर आता फळांकडे वळवला ‘नामांतर’ मोर्चा; ड्रॅगन फ्रूटचं केलं बारसं

January 20, 2021
भास्करराव पेरे पाटलांनी सांगितले मुलीच्या पराभवाचे खरे कारण; वाचून धक्का बसेल

भास्करराव पेरे पाटलांनी सांगितले मुलीच्या पराभवाचे खरे कारण; वाचून धक्का बसेल

January 20, 2021
धनंजय मुंडे प्रकरण! …तर कारवाईची जबाबदारी आमची; शरद पवारांनी केले मोठे विधान 

धनंजय मुंडे प्रकरण! …तर कारवाईची जबाबदारी आमची; शरद पवारांनी केले मोठे विधान 

January 20, 2021
कृषी कायद्याला विरोधात सेलिब्रिटीही मैदानात; ‘माझ्या बापाला माझा पाठिंबा असणारच’

‘जो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, त्यालाच निवडणुकीचं तिकीट देणार’

January 20, 2021
पेट्रोल पंपावरील फसवणूक टाळण्यासाठी काय कराल? वाचा ‘या’ सोप्या ट्रिक्स

पेट्रोल पंपावरील फसवणूक टाळण्यासाठी काय कराल? वाचा ‘या’ सोप्या ट्रिक्स

January 20, 2021
माझा कारभारी लय भारी! …म्हणून मी पतीला खांद्यावर उचलून घेऊन विजयोत्सव साजरा केला

‘या’ कारणामुळे विजयी नवऱ्याची बायकोने काढली खांद्यावरुन मिरवणूक; घ्या जाणून

January 20, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.