मोठी बातमी! रेखा जरे हत्याप्रकरण, पत्रकार बाळ बोठेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची भररस्त्यात हत्या झाली होती. रेखा जरे यांची हत्या पत्रकार बाळ बोठे याने केली असल्याचं समोर आलं होतं. जरे यांच्या हत्येनंतर अनेक महिने बाळ बोठे फरार झाला होता. अहमदनगर पोलिसांनी शिताफीने बाळ बोठेच्या हैद्राबादमधून मुसक्या आवळल्या आहेत.

बाळ बोठेने सुपारी देऊन जातेगाव घाटात रेखा जरे यांची निर्घूणपणे हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून बोठेने दिलेली रक्कम जप्त करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.

घटनेनंतर बाळ बोठे फरार झाला होता. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी पथके रवाना केली होती. मात्र तो पोलिसांना नेहमी गूंगारा देत होता. अखेर नगर पोलिसांनी हैद्राबाद येथे जाऊन बाळ बोठेच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बाळ बोठे सोबतच पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या तिघा जणांनाही अटक केली आहे. त्यांनी बाळ बोठे फरार असताना त्याला पैसे पुरवले आहेत, त्याला मदत केली असल्यांच समोर आलं आहे.

दरम्यान तब्बल साडेतीन महिन्यानंतर बाळ बोठे पोलिसांच्या जाळ्यात अडकला असल्याने या प्रकरणाचा खुलासा लवकरच होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-
संजू बाबाला किस करायला घाबरत होती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; मग वडीलांनी दिली ट्रेनिंग
पोलिसांना नडणे तरूणीला चांगलेच भोवले, पोलिसांनी भर चौकात मारली तरूणीच्या कानाखाली
तैमूर गाडीतून उतरताच भडकला, आणि थेट काचेवर जाऊन धडकला, पाहा व्हिडिओ
नशीब फळफळलं! बारामतीचा ‘तो’ रिक्षावाला लावणीसम्राट चित्रपटात झळकणार

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.