आजकाल कुठे गायब आहे ‘जोश’ चित्रपटातील ‘हा’ अभिनेता; वाचा त्याचा खडतर प्रवास

बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्यांनी खलनायकाचे काम केले आहे. पण त्यातील प्रत्येकाला वेगळी ओळख निर्माण होत नाही. तर काही कलाकार मात्र एका चित्रपटातूनच आपली वेगळी ओळख निर्माण करतात. पण त्यांची ही ओळख जास्त काळ टिकू शकत नाही. खुप कमी वेळात ते इंडस्ट्रीतून गायब होतात.

अभिनेता शरद कपूर देखील अशाच काही अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याचा अभिनय देखील अतिशय उत्तम होता. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. पण हे चित्रपट त्याला अभिनेता म्हणून ओळख निर्माण करुन देऊ शकले नाही.

शरद कपूरचा जन्म १४ फेब्रूवारी १९७६ ला कोलकात्तामध्ये झाला होता. त्याला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात आवड निर्माण झाली होती. तो शाळेत असताना अनेक नाटकांमध्ये सहभाग घ्यायचा. कॉलेजमध्ये त्याने एकांकिका आणि नाटके केली. त्यामूळे त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा झाली.

शरदने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली. पण त्याला अभिनय क्षेत्र खुणावत होते. म्हणून त्याने त्याचा मोर्चा अभिनय क्षेत्राकडे वळवला. त्याने अभिनेता म्हणून काम करण्याची इच्छा जाहीर केली. त्याने ‘हिरो’ चित्रपटातून त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात केली.

या चित्रपटानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्याने ये है जलवा, क्यूं मै झुठ नही बोलता, हातियार, एलओसी कारगिल, कुछ तुम कहो कुछ हम कहें, जोश यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याने यातील अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केले.

शरदला खरी ओळख ‘जोश’ चित्रपटातून मिळाली होती. त्याला या चित्रपटासाठी अवॉर्ड देखील मिळाले होते. पण या अवॉर्डचा त्याला काही फायदा झाला नाही. त्याने चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण अभिनेता म्हणून काम मिळत नव्हते.

दोन दशकांच्या करिअरमध्ये शरदने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला फक्त जोश चित्रपटासाठी ओळखले जाते. त्याचे बॉलीवूडमधले स्ट्रगल अजूनही थांबले नाही. शरदची मेहनत बघून बॉलीवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या मदतीला धावून आला.

सलमानने ‘जय हो’ चित्रपटामध्ये शरदला काम दिले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकला नाही. त्यामूळे शदरला परत एकदा अपयश सहन करावे लागले. बॉलीवूडसोबतच शरदने बंगाली चित्रपटांमध्ये देखील काम केले. पण त्याला यश मिळाले नाही.

‘जबरीया जोडी’ हा शरदचा बॉलीवूडमधला शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटानंतर तो दुसऱ्या कोणत्याही चित्रपटामध्ये दिसला नाही. सध्याच्या घडीला शरद त्याचा बिजनेस सांभाळत आहे. यशस्वी अभिनेता नसला तरी शरद यशस्वी बिजनेस मॅन देखील आहे.

शरदचा हॉटेलचा बिजनेस आहे. मुंबई आणि कोलकात्तासोबतच शरदचे अनेक ठिकाणी हॉटेल आहेत. या व्यवसायातून शरद वर्षाला करोडो रुपये कमवतो. तो करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. अनेक ठिकाणी त्याचे मोठे बंगले आहेत. त्याला चांगली स्क्रिप्ट मिळाली तर तो परत एकदा अभिनय क्षेत्रात प्रवेश करु शकतो.

महत्वाच्या बातम्या –

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल होते राजकूमार; पण तिने मात्र लग्नाला दिला होता नकार

चित्रपटातील अभिनेत्यानेच केली रोहित शेट्टीच्या चित्रपटातील ‘त्या’ स्टंटची पोलखोल, पहा व्हिडीओ

‘आपके प्यार मैं’ गाण्यात हॉटनेसने आग लावणारी अभिनेत्री मालिनी शर्मा आज करते ‘हे’ काम

बापरे! ‘त्या’ दिवशी नर्गिस दत्त रेखाला म्हणाल्या होत्या चुडैल; कारण ऐकूण धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.