हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड यांच्यात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यावर अखेर निर्णय आला आहे. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने हा खटला जिंकला आहे. न्यायालयाने हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपच्या(Johny Depp) बाजूने निकाल दिला आहे. या निकालामुळे अभिनेत्री अंबर हर्डला मोठा धक्का बसला आहे. (johny depp win case against actress amber heard)
न्यायालयाने अभिनेत्री अंबर हर्डला १० दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई आणि ५ दशलक्ष डॉलर दंडात्मक नुकसान भरण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेत्री अंबर हर्डने आपली बदनामी केली आहे, असे म्हणत अभिनेता जॉनी डेपने तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने अभिनेत्री अंबर हर्डला दोषी ठरवले आहे.
अभिनेत्री अंबर हर्डने देखील जॉनी डेपविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावेळी मानहानीच्या काही गुन्ह्यांसाठी न्यायालयाने अभिनेता जॉनी डेपला देखील दोषी ठरवले आहे. त्याला न्यायालयाने २ दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सात-न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आहे.
तीन दिवसांपूर्वीच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. पण न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयाने अंतिम निकाल देत मानहानीच्या प्रकरणात अभिनेत्री अंबर हर्डला दोषी ठरवले आहे. हा निकाल जाहीर होताच जॉनी डेपच्या चाहत्यांनी आनंद साजरा केला आहे. जॉनी डेपच्या चाहते निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाबाहेर जमले होते.
निकाल जाहीर होताच जॉनी डेपच्या चाहत्यांनी जल्लोष केला. गेल्या सहा आठवड्यांपासून या खटल्यात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. हा हाय-प्रोफाइल खटला असल्यामुळे न्यायालयाने निकाल जाहीर करण्यापूर्वी तीन दिवस सात न्यायाधीशांनी यावर चर्चा केली. त्यानंतर न्यायालयाने हा निकाल जाहीर केला आहे.
२०१८ मध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. जॉनी डेपची माजी पत्नी अभिनेत्री अंबर हर्डने हा लेख लिहिला होता. या लेखात अभिनेत्री अंबर हर्डने स्वतःला घरगुती हिंसाचाराचा बळी असल्याचे सांगितले होते. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर अभिनेता जॉनी डेपने अभिनेत्री अंबर हर्ड विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
सरसेनापती हंबीरराव रिलीज झाल्यानंतर राज ठाकरे तब्बल दोन तास.., प्रविण तरडेंनी सांगितला किस्सा
काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामिल होताच हार्दिक पटेल म्हणाले, ‘मोदींचा शिपाई म्हणून काम करणार’
‘तो खेळ बदलू शकेल एवढा मोठा खेळाडू नाही’, विश्वविजेत्या क्रिकेटरने रियान परागला फटकारले