कुत्र्यावर इतका भयानक अत्याचार; व्हिडिओ पाहून जॉन अब्राहमची पण उडाली झोप

सध्या देशभरात अनेक धक्कादायक घटना घडताना दिसून येत आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या काही घटनाही समोर येत आहे. अशात काही लोकं प्राण्यांवरही अत्याचार करत आहे.

अशातच राजस्थानमध्ये माणसाचे क्रुरतेचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे. एका माणसाने कुत्र्यावर अत्याचार केले आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे सगळीकडून या घटनेला विरोध केला जात आहे.

आता हा व्हिडिओ बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमपर्यंत पोहचला आहे. हा व्हिडिओ पाहून जॉन अब्राहम खुप व्यथित झाला आहे. तसेच या घटनेवर त्याने प्रतिक्रीया दिली आहे.

संबंधित घटना ही राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील रैणी गावातील आहे. या गावातील सहा लोकांनी एका कुत्र्याला बांधुन त्याचे तीन कुऱ्हाडीने पाय तोडून टाकले होते. या संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला होता.

आता या व्हिडिओबद्दल जॉन इब्राहमने प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला रात्रभर झोप आली नाही. त्यानंतर त्याने अलवरच्या पोलिसांना फोन लावला आणि पोलिस अधिक्षक तेजस्विनी गौतम यांच्याशी या विषयावर चर्चाही केली. तसेच जॉनने प्राण्यांवर प्रेम करा, असे लोकांना आवाहन केले आहे.

तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप आली नाही. त्यानंतर मी लगेचच अलवरच्या पोलिस अधिक्षकांना फोन लावला. त्यांनी मला सांगितले, की त्या आरोपींना लगेच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मी पोलिसांना त्याबद्दल धन्यवाद म्हटलो, असे जॉन अब्राहनमने म्हटले आहे.

तसेच पोलिस त्यांचे काम करत असतात, आपण त्यांना साह्य करणे गरजेचे आहे. माझं सगळ्यांना आवाहन आहे की आजूबाजूला अशा काही घटना दिसल्या तर तातडीने तक्रार करा. प्राणीही माणसासारखेच असतात. त्यांचीही काळजी घ्यायला हवी, त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे, असेही जॉन अब्राहमने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

देवमाणूस मालिकेत मोठा ट्विस्ट, दिव्या सिंग मालिकेतून होणार बाहेर, आता होणार ‘ही’ नवीन एन्ट्री
बायकोच्या त्रासाला कंटाळून पुरुषांनीच केले वडाचे पूजन, एकच बायको सात जन्मी नको म्हणून केली प्रार्थना
लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीला नवरदेवाच्या भावाने रस्त्यातच केली मारहाण; धक्कादायक कारण आले समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.