जेव्हा ती तुम्हाला सांगते, जा आणि दरवाजाची कडी लाव; पहा आर्चर काय म्हणतोय विराटला..

मुंबई| सध्या आयपीएलचा तेरावा सीजन चालू आहे. कोरोनाने जगात जरी हाहाकार माजवला असला तरी आयपीएलमुळे भारतीय लोकांना जरासा दिलासा मिळाला आहे. तसे बघायचे झाले तर सगळ्याच टीम्स आपल्या परीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसे बघायचे झाले तर चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांना काही खास कामगिरी बजावता आलेली नाही. नुकतीच किंग्स इलेव्हन पंजाब विरूध्द रॉयल चैलेजंर्स बैगलोर यांच्यात सामना झाला. या सामन्यात बेंगलोर ने बाजी मारली.

सुरूवातीला बेंगलोरला चांगली कामगिरी करता आली नव्हती पण सध्या हा संघ खुप फॉर्म मध्ये आहे. याचदरम्यान कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये विराट कोहली डान्स करताना दिसत आहे.

यामध्ये विराट कोहली थिरकताना दिसत आहे. मैदानावर जरी एकदम आक्रमक दिसणारा विराट कोहली जेव्हा खेळापासून दूर असतो तेव्हा त्याचा स्वभाव पुर्णपणे भिन्न असतो. जेव्हा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला तेव्हा चाहत्यांना हसू आवरले नाही. कारण विराट कोहली जमिनीवर झोपून डान्स करत होता.

चाहत्यांनी त्या व्हिडिओला वेगवेगळी गाणी टाकून व्हीडिओ एडिट करून व्हायरल केले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. यावर काही खेळाडूंनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जोफ्रा आर्चर तुम्हाला माहीत असेल.

आतापर्यंत जोफ्रा आर्चरने अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर धूळ चारली आहे. विराट कोहलीचा डान्स करतानाचा व्हीडिओ जोफ्राने ट्विटरवर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, जेव्हा ती तुम्हाला सांगते जा आणि दरवाजाची कडी लाव.

हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले आहे. जोफ्राच्या या ट्विटला अनेक चाहत्यांनी रिप्लाय दिला आहे. दरम्यान, विराटची विराटसेना सध्या खूप चांगली कामगिरी करत आहे. विराटनेही या मोसमात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.