“पुढील चार वर्ष झोप घ्यायची असेल तर…” जो बायडन यांना किम जोंग उनच्या बहिणीने दिला दम

अमेरिका | ‘डेमोक्रॅटिक पक्षाचे’ जो बायडन यांनी काही दिवसांपुर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. नव्याने राष्ट्राध्यक्ष झालेले जो बायडन यांना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची बहिण किंम यो जोंगने थेट दम दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे.

किम यो जोंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना “पुढील चार वर्षांपर्यंत रात्री आरामात झोपायचं असेल, तर त्यांनी कोणतीही कारवाई करू नये” असा सज्जड दम दिला आहे. किंम यो जोंग या किम जोंग उनच्या प्रमुख सल्लागार आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन उत्तर कोरिया आणि आजूबाजूच्या प्रदेशातील मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी जपान आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाने सैन्य अभ्यासाला सुरूवात केली आहे.  या कारणामुळे उत्तर कोरिया अमेरिकेवर भडकला आहे, त्यांनी याला विरोध दर्शवला आहे. उत्तर कोरियाने त्यांची भुमिका पत्रक प्रसिध्द करून स्पष्ट केली आहे.

अमेरिकेला पुढील चार वर्षांपर्यंत सुखात झोप घ्यायची असेल, तर त्यांनी असे कोणतेच पाउल उचलू नये. उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये शांतता राखायची असेल तर, दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली समितीही बरखास्त करू. असंही किम यो जोंग यांनी म्हटलं आहे.

किम यो जोंग या भाऊ किम जो उनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. किम जो उननंतर उत्तर कोरियाची सुत्रे किम यो जोंगकडे येणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
चाहत्यांना दिसला नेहा कक्करचा कातिलाना अंदाज; फोटो पाहून तुम्हीही व्हाल पागल
काय सांगता! ३०० रुपयांच्या चप्पला विकत घेऊन या बहिणी कमवताय लाखो रुपये, जाणून घ्या कसं
“भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल”
करिश्मा कपूर नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे अक्षय खन्नाचे पहीले प्रेम; नाव वाचून धक्का बसेल

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.