शपथविधी आधी जो बायडन जखमी, पायाला मोठी दुखापत..

अमेरिकेत झालेल्या अतिशय अटीतटीच्या निवडणूकीत जो बायडन यांनी सत्ता मिळवली. मात्र ते आता सत्ता संभाळण्याआधी जखमी झाले आहेत. आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत असताना ते खाली पडले आणि फ्रॅक्चर झाले आहेत.

त्यांचा शपथविधी देखील जानेवारीत होणार होता. यामुळे आता त्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बायडेन आपल्या कुत्र्यासोबत खेळत असताना पडले. त्यांच्या डाव्या पायाच्या हाडामध्ये क्रॅक आहे. त्यामुळे ते पुढचे काही दिवस मदतीशिवाय चालू शकत नाहीत, असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेमध्ये निवडणूकीत मोठा गोंधळ आपल्याला बघायला मिळाला. अनेकदा मत मोजणी देखील थांबवण्यात आली.

त्यांना कुत्र्यांची आवड आहे. त्यांच्याबर ते खेळत असताना ते पडले, यामुळे हा सर्व प्रकार घडला. अमेरिकेत सध्या नवीन मंत्र्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प आपला पराभव स्वीकारत नव्हते. मात्र आता त्यानी पराभव स्वीकारला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.