जो बायडन यांच्यावर भारताला मदत करण्याचा दबाव वाढला; युएस चेंबर्सकडून भारताला लस देण्याची मागणी

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

तसेच १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोना लस देण्यात यावी,अशा सुचनाही केंद्र सरकारने दिल्या आहे. भारताची परिस्थिती पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर भारताला मदत करण्यासाठी दबाव वाढत चालला आहे.

कोरोनाच्या संकटात भारताला मदत करण्यास नकार दिला होता. पण आता युएस चेंबर्स ऑफ कॉमर्ससोबतच काही अमेरिकन नेत्यांनी आणि भारतीय अमेरिकन लोकांनी भारताला कोरोनाच्या संकटात मदत करण्याची मागणी केली आहे.

अस्ट्रेझेनकासोबतच अन्य कोरोना लसी आणि कोरोना रुग्णांवर प्रभावी असणारी औषधे भारताला पाठवली गेली पाहिजे, अशी मागणी युएस चेंबर्स कॉमर्सने केली आहे. त्यामुळे अमेरिकी सरकार भारताला मदत करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आता अमेरिकेला लसींची गरज पडणार नाही. कारण आता प्रत्येक अमेरिकन नागरीकाला लस देण्यासाठी स्थानिक लस निर्माते पुरेल इतक्या लसी जूनपर्यंत तयार करुन घेतील. त्यामुळे भारताच्या अशा स्थितीत जर अमेरिकेने त्यांची मदत केली तर भारत-अमेरिकाचे नाते तर चांगलेच होईल, सोबतच कोरोनाला हरवण्यातही मदत होईल, असे युएस चेंबर्स ऑफ कॉमर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष मायरोन ब्रिलियंट यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारताने याआधी अमेरिकेला कोरोनाच्या संकटात मदत मागितली होती. पण तेव्हा अमेरिकेने मदतीसाठी नकार दिला होता. आम्ही भारताची स्थिती जाणून आहोत पण अमेरिकेची परिस्थितीही वाईट असल्याने आम्हाला मदत करणे शक्य नाही, असे अमेरिकेने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

डॉक्टरांचा सल्ला! प्रिस्क्रिप्शनवर लिहितात, एक झाड लावा ऑक्सिजन कमी पडणार नाही
कसा काय रातोरात स्टार झाला एक साधारण जिंगल बनवणारा मुलगा, वाचा त्याची यशोगाथा
धुणी भांडी करून मुलाला आईने शिकवले, आता मुलाने झोपडपट्टीतून गाठले थेट इंग्लंड, पण..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.