धक्कादायक! जोधा अकबर फेम अभिनेत्याला झाला ‘हा’ गंभीर आजार; जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय

टिव्हीवर सुरु असलेल्या काही मालिका अशा असतात, ज्या चांगल्याच चर्चेत असतात. पण काही मालिका या अशा असतात ज्या आता सुरु नसतानाही त्यांच्या चर्चा सुरु असतात. त्यापैकीच एक मालिका म्हणजे जोधा अकबर.

जोधा अकबर या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराने आपली एक ओळख बनवली होती. तसेच त्यांच्या पात्रामुळे मालिकेला वेगळं वळण दिलं होतं. याच मालिकेतील अभिनेते लोकेंद्र सिंह राणावत.

लोकेंद्र सिंह राणावत कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे चर्चेत आले होते. पण आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आधी ते फक्त आर्थिक संकटांचा सामना करत होते, पण आता त्यांनी आपला पायही गमावला आहे.

कोरोना संकटामुळे ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. अशास्थितीतच त्यांची मधूमेहामुळे प्रकृती बिघडली. लोकेंद्र यांच्या तणावात जास्त वाढ झाली, त्यामुळे त्यांच्या मधूमेहाचे प्रमाण वाढत गेले. ज्यामुळे लोकेंद्र यांना आपला पाय गमवावा लागला आहे.

माझ्या उजव्या पायात कॉर्न विकसित झाल होता, त्यामुळे प्रकृती बिघडली. आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्यामुळे मी त्याकडे दुर्लक्षित करत गेलो. त्यानंतर ते पसरत असल्याचे लक्षात आले. तो संपुर्ण शरीरात पसरत चालला होता, त्यामुळे जीव वाचवण्याचा एकच पर्याय होता, तो म्हणजे पाय कापण्याचा, असे लोकेंद्र यांनी म्हटले आहे.

आता वाटते १० वर्षांपूर्वी जेव्हा मधूमेह झाल्याचे कळले तेव्हाच काळजी घेतली पाहिजे होती. ठरावीक वेळेत औषधे घेतली पाहिजे होती, खाण्यासाठी वेळ ठरलेली नव्हती. कामामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष झालं, असे लोकेंद्र यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: भरमंडपात ढसाढसा रडायला लागली नवरी; नवरदेवाने सगळ्यांसमोर किस करत केलं गप्प
डायबिटीज आणि कर्करोगापासून वाचण्यासाठी भेंडीचा करा अश्याप्रकारे वापर; तज्ञांनी दिला सल्ला..
टाटांचा ‘हा’ शेअर वर्षात पोहोचला ४७ रुपयांवर, ज्यांनी गेल्यावर्षी गुंतवले १ लाख त्यांचे झाले १२ लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.