३०० रुपयांची नोकरी ते करोडोंचे मालक, मोठ्या शहरात घरे, विमाने, हेलिकॉप्टर, जाणून घ्या अदानी यांची संपत्ती..

मुंबई । देशातसह जगात टाटा, अंबानी यांच्यानंतर उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या यादीत जाणून बसले आहेत. त्यांनी देखील सुरुवातीचे दिवस अगदी गरिबीत काढले होते. चाळीत राहणे, स्कूटरवर फिरणे, मुंबईला ३०० रुपयांत नोकरी करणे इथंपासून आता स्वतःच्या मालकीची दोन जेट विमाने आणि ४ हेलिकाॅप्टरपर्यंत त्यांच्याकडे आहेत.

गुजरातच्या अहमदाबादमधील पोल परिसरात एका चाळीत, एका गरीब जैन कुटुंबात २४ जून १९६२ मध्ये गौतम अदानींचा जन्म झाला. ते शिक्षण अर्धवट सोडून १६ वर्षांचे असताना मुंबईला आले. त्यांनी हिंद्रा बदर्समध्ये ३०० मासिक पगारावर काम सुरू केले.

त्यांनी मुंबईच्या डायमंड इंडस्ट्रीमध्ये स्वतःला आजमविण्याचा प्रयत्न केला. पण, दरम्यानच्या काळात मोठ्या भावाने प्लॅस्टिकचा व्यापार सुरू केला होता, त्यामध्ये काम करण्यासाठी गेले होते. नंतर १९८८ मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्हेंचर सुरू केले. याच वर्षी अदानी ग्रुपची स्थापना केली.

अदानी ग्रुपने १९९१ नंतर वीज, कोळसा, गॅस, तेल या क्षेत्रांकडे लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर अदानी ग्रुपचा विस्तार प्रचंड झाला आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत ग्रुप म्हणून नावारुपास आला. अदानी ग्रुपमध्ये एकूण ६ कंपन्या आहेत.

या कंपन्यांच्या भांडवलांची किंमत ही ८० अब्ज डाॅलर इतकी आहे. कंपन्यांचे शेअर्सचे भाव वधारले आणि अदानींच्या एकूण संपत्तीत ५०० टक्क्यांनी वाढ झाली. त्यात गौतम अदानींचा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे. इथंच अदानी ग्रुप थांबला नाही, तर त्यांच्या अनेक कंपन्यांनी देशातील अनेक बंदरं विकत घेतली आहेत. देशाबाहेर देखील अनेक कंपन्या त्यांनी घेतल्या आहेत.

आशिया खंडातील १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. अदानी यांची संपत्ती ३३.७ अब्ज डाॅलरवरून ६६.५ अब्ज डाॅलरपर्यंत गेली आहे. ४ लाख ८४ हजार करोड रुपये इतकी संपत्ती गौतम अदानी यांची आहे.

गौतम अदानी आपल्या आलिशान घरापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी हेलिकाॅप्टरचा वापर करतात. त्यांच्याकडे ४ हेलिकाॅप्टर, दोन जेट विमानं, फरारी, बीएमडब्ल्यू, रोल्स राॅयल्स, लिमोझिन कंपन्यांच्या आलिशान कार आहेत. जगभरात अनेक आलिशान बंगले आहेत.

ताज्या बातम्या

याला म्हणतात मद्यप्रेमी! दारुची दुकान उघडल्याने बाटलीची दिवा लावून केली पुजा आणि नंतर…; पहा व्हिडिओ

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

तुमच्या गाडीचा अपघात झाल्यास खरंच भरपाई द्यायची असते का? जाणून घ्या नियम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.