पुणे | शिक्षण घेणाऱ्या युवा लोकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. प्रत्येक वर्षी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन लाखो तरुण-तरुणी बाहेर पडत आहेत. या सर्वांनाच स्वत:चा व्यावसाय करणे शक्य होत नाही. काही लोक नोकरीकडे वळतात आणि त्याठिकाणी ते चांगल्या पगारावर काम करु शकतात. २०२१ या कोरोनानंतरच्या परिस्थितीत रोजगाराच्या अनेक संधी आहेत.
नोकरी म्हणजेच रोजगाराच्या संधी वेगवेगळ्या क्षेत्रात दरवर्षीच उपलब्ध असतात. त्या कमी-अधीक प्रमाणात क्षेत्राच्या आर्थिक उलाढालीच्या व्यापकतेवर ठरतात. प्रत्येक वर्षी रोजगाराच्या संधीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होताना दिसते. परंतु ही संख्या खुप कमी ठरते. कारण शिक्षण घेतलेल्यांची संख्याही तितकीच मोठी आहे.
दरम्यान, कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला. या काळात सर्वच क्षेत्रांना मोठे नुकसान झाले. २०२० हे वर्ष या कोरोनाच्या परिस्थितीत वाया गेले. आता २०२१ या वर्षात रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध होतील. नोकरी गमावलेल्या तसेच नव्याने रोजगार हवा असणाऱ्यांकरता हे वर्ष महत्वाचे ठरणार आहे.
..तर मग जाणून घेऊया भारतात कोणत्या नोकऱ्यांना मागणी असेल.
फुल स्टॅक डेव्हलपर्स
कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनंतर ऑनलाईन पद्धतीने सर्व कामे केली गेली. जवळपास सर्वच व्यवस्थेला ऑनलाईचे स्वरुप प्राप्त झाले. त्यामुळे वेब डेव्हलपिंग तसेच त्याचा मेंटेनंन्सशी संबंधित काम करणाऱ्यांची बाजारपेठेत मागणी वाढली आहे. कोडिंग, जावा, सीएसएस, पायथन इत्यादी गोष्टींचे ज्ञान असल्यास आपल्याला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
आर्टिफिशियर इंटेलिजेंस(AI)
आकडेवारीनुसार या क्षेत्रात काम करणाऱ्यांची २५०० पदे रिक्त आहेत. तसेच दररोज नव्याने यात काम करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मुळात भारतात या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. यासाठी एआय, अल्गोरिदम, प्रोग्रामिंग तसेच सोशल मीडिया यांच्या संबंधिचा सखोल अभ्यास असल्यास आपल्याला अनेक संधी आहेत.
डेटा सायंटिस्ट
या क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक मोठी संधी या वर्षात मिळणार आहे. २०१८ च्या तुलनेत ११ टक्के वाढ होत ऍनॅलेटिक्स रेव्हेन्यू १६ टक्के झाला आहे. भारतात डेटा सायंटिस्टची मागणी वाढत आहे. अहवालानुसार या क्षेत्राची व्याप्ती मोठ्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी आकडेवारी, गणितासोबत एसक्यूएल, पायथन आणि आर सारख्या तांत्रिक भाषेचे ज्ञान आणि पॉवर बीआय सारख्या गोष्टींची यासाठी माहिती असणे आवश्याक आहे.
डिजीटल मार्केटिंग
या फिल्डमध्ये पुर्वीपासुन नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु या वर्षात या क्षेत्रातील एकुण परिस्थिती बदलली आहे. या क्षेत्रात आता चांगल्या पगाराच्या संधी आहेत. क्रिएटीव्ह काम करणाऱ्या व्यक्तीला या क्षेत्रात जास्त मागणी आहे. अलीकडेच डिजीटल मार्केटींगच्या क्षेत्र वेगाने वाढत आहे. एमबीए, डिजीटल मार्केटींगचा कोर्स केलेल्यांना प्रधान्याक्रम असणार आहे. ऑनलाइन झालेल्या व्यवस्थेत तरुणांना याठिकाणी चांगल्या संधी उपलब्ध असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! पाचवी पास असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या..
नोकरीची सुवर्णसंधी! हजारो रिक्त पदांसाठी भरती सुरु; ‘असा’ करा अर्ज
आता महिन्याला लाखोंची कमाई! वाचा कोरोनामध्ये नोकरी गेलेल्या तरुणाच्या जिद्दीची कहाणी
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली पठ्ठ्याने बांधले पोल्ट्रीशेड, आज कमवतोय लाखो…