काय सांगता! फक्त बिस्किटाची चव चाखण्यासाठी मिळेल ४० लाख रूपये पगार

नोकरीविषयी प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात. प्रत्येकाला एक चांगला पगार देऊन थोडी मजा आणि काम करण्याची इच्छा आहे. प्रश्न असा आहे की अशी नोकरी मिळणे शक्य आहे का? एक छोटीशी कल्पना करा की बिस्किटे चाखण्यासाठी तुम्हाला ४० लाखचे वार्षिक पॅकेज मिळाले तर? होय, बॉर्डर बिस्किट ही स्कॉटिश बिस्किट कंपनी अशा प्रकारच्या काही नोकऱ्या देत आहे.

स्कॉटलंडची एका बिस्किट कंपनी ‘बॉर्डर बिस्किट्स’ला आपल्यासाठी ‘मास्टर बिस्किटर’ हवा आहे. कंपनी बिस्किट चाखण्याच्या बदल्यात ४० हजार पाउंड म्हणजेच ४० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देणार आहे.तर ही व्हॅकन्सी फुल टाइम असेल आणि वर्षात ३५ दिवसांची सुट्टी सुद्धा मिळेल.

यासाठी पात्रताही वेगळी आहे. चव आणि बिस्किट उत्पादनातील मोठी समज, नेतृत्व कौशल व संवाद कलेत पारंगत असण्याची आवश्यकता आहे. ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी खास उपाय सुचवणार्‍यांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.

कंपनी ग्राहकांना सर्वश्रेष्ठ स्वाद आणि गुणवत्तेचे बिस्किट देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आपल्या याच प्रतिबद्धतेचा अवलंब करण्यासाठी कंपनीला नव्या ‘मास्टर बिस्किटर’चा शोध आहे. असे कंपनीची हेड ऑफ ब्रँड सूजी कारलॉ म्हणतात.

“आम्ही देशभरातील लोकांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत आणि काही उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.” असे बॉर्डर बिस्किट्स’चे व्यवस्थापकीय संचालक पॉल पार्किंस यांनी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

जीवाची परवा न करता कर्मचाऱ्याने सुरू केला मुंबईचा वीजपुरवठा, आनंद महिंद्रांनीही केले कौतुक

बातमी कामाची! ऑनलाईन शॉपिंग करताना घ्या अशी काळजी; अन्यथा होऊ शकते फसवणूक 

तुमचं आमचं गाडीचं स्वप्न पुर्ण करताहेत टाटा! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.