पोलिसाच्या नोकरीत लागले नाही मन, आता बटाट्याची शेती करून कमवतोय वर्षाला ३.५ कोटी, वाचा..

अनेकांना शेतीची, आपल्या मातीची आवड असते. मग कितीही मोठ्या पगाराची नोकरी असली तरी त्यांचे मन त्याठिकाणी लागत नाही. असे अनेकजण आहेत की ज्यांनी मोठ्या पगाराची सरकारी नोकरी सोडून शेती करून मोठे उत्पन्न घेतले आहे. अशाच एका व्यक्तीने बटाट्याची लागवड सुरू करून करोडो रुपये कमवले आहेत.

त्यांचे नाव पार्थिभाई जेठाभाई चौधरी असे आहे. ते पोलीस खात्यात एका अधिकाऱ्याची नोकरी करत होते. त्यांना पगार देखील चांगला होता. असे असताना त्यांचे मन याठिकाणी लागत नव्हते. त्यांना या नोकरीत आनंद मिळत नव्हता. यामुळे त्यांनी ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, आणि ते गावी आले.

त्यांना शेतीची माहिती होती असे नाही, त्याच्याकडे शेतीविषयी कोणतीही माहिती नव्हती. शेती करण्यापूर्वी त्यांनी आधुनिक शेती पद्धती समजून घेण्याचा प्रयत्न केला. अगोदर त्यांनी सर्व गोष्टीची माहिती मिळवली, आणि शेती करण्यास सुरुवात केली. ते बटाट्याची शेती करतात.

आज अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांचे बटाटे खरेदी करतात. ते बटाट्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करतात. यामुळे कंपनीला खूप फायदा होतो. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे ३.५ ​कोटी आहे. १६ जण त्यांच्यासोबत काम करतात. पार्थीभाईंनी इतक्या बटाट्याचे उत्पादन केले की ते आज ‘पोटॅटोमन’ म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांना कॅनडाच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीकडे कृषी प्रक्रिया प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. गुजरातचा बनासकांठा जिल्हा शेतीसाठी प्रसिद्ध आहे. आज पार्थीभाई शेतीतून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. पार्थीभाईंनी ठिबक सिंचन तंत्राचा अवलंब केला. या तंत्राद्वारे, पिकाच्या थेंबामध्ये पाणी टाकले जाते, पाण्याची देखील बचत होते.

ते ८७ एकरात बटाटे लागवड करतात, ते चिप्स उत्पादनासाठी विकले जातात. ते बालाजी वेफर्स या स्वदेशी कंपनीला चिप्स पुरवत आहेत. यामुळे त्यांचा फायदा होतो. मागणीप्रमाणे ते बटाटे विकतात. त्यांच्याकडे कोल्ड स्टोरेज देखील आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.