इंडियन ऑईलमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! एक लाखांपर्यंत मिळणार पगार; ‘असा’ करा अर्ज

 

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. त्यामुळे सध्या अनेक तरुण नोकरिच्या शोधात आहे. अशात तरुणांसाठी सरकारी नोकरिची एक सुवर्ण संधी आली आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीने कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेशक आणि इतर पदांसाठी भरती सुरु केली आहे. जर तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.

भरती निघालेल्या पदांची संख्या ५७ इतकी आहे. हि भरती हरियाणाच्या पानीपत येथे निघालेली आहे. इंडियन ऑईलमध्ये निघालेल्या या पदांसाठी २५ हजार ते १ लाख ५ हजार पर्यंत दरमहा पगार मिळणार आहे.

या पदांसाठी तुमचे अभियंताक्षेत्रात डिप्लोमा किंवा बी.एससीचे शिक्षण पुर्ण असणे, तसेच वय १८ ते २६ वर्षे असणे गरजेचे आहे. जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल, तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकतात. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.iocrefrecruit.in/ ला भेट देऊ शकतात. या वेबसाईटवर पदांच्या भरतीसंबंधी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासंबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या-

८० वर्षांचा योद्धा अ‍ॅक्शन मोडमध्ये! बेजार बळीराजाच्या भेटीला थेट बांधावर

पुणे तिथे काय ऊणे! चक्क बसस्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षीस

स्मार्टफोनच्या किंमतीत मिळत आहेत हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना; किंमत फक्त…

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.