BPNL मध्ये १० वी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली | नुकतीच १० वी आणि १२ वी पास झालेल्या आणि पदवीधर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय पशुसंवर्धन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने विविध पदांवर भरती काढली आहे.

त्यानुसार पशुसंवर्धन महामंडळ सेल्स असिस्टंट, सेल्स डेव्हलपमेन्ट अधिकारी व सेल्स मॅनेजर या पदांवर नियुक्ती करण्यात येईल. या पदासाठी अर्ज करण्यास जे जे इच्छुक आहेत त्यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करण्याची मुदत आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.bhartiyapashupalan.com या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. सगळ्या सूचना पूर्ण वाचल्यानंतर अर्ज करावा. अर्ज करताना फॉर्ममध्ये कोणताही गोंधळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. गोंधळ झाल्यास फॉर्म नाकारला जाईल.

एकूण ३३४८ पदे आहेत. त्यातील सेल्स असिस्टंटची २७०० पदे आहेत. तसेच सेल्स डेव्हलपमेंट अधिकाऱ्याची ५४० पदे आहेत. आणि सेल्स मॅनेजरची १०८ पदे पदे आहेत. सेल्स असिस्टंट पदावर अर्ज करण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून १० वी उत्तीर्ण असावी.

सेल्स डेव्हलपमेंट अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची किमान बारावी उत्तीर्ण असावे. सेल्स मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असले पाहिजे.

प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा निश्चित केली गेली आहे. सेल्स मॅनेजरचे वय २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे. सेल्स डेव्हलपमेंट अधिकारी व सेल्स असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्षे असायला हवे.

सेल्स असिस्टंटला १५,००० वेतन असेल तसेच सेल्स डेव्हलपमेंट अधिकाऱ्याला १८,००० वेतन असेल आणि सेल्स मॅनेजरला २१,००० वेतन मिळेल. सेल्स मॅनेजरसह इतर सर्व पदांच्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीतून केली जाणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.