बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! स्टेट बँकेत पाच हजार जागांची बंपर भरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज

कोरोनाच्या संकटात अनेक लोकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत, अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहे. त्यामुळे अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत.

आता नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्कची बंपर भरती निघाली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून क्लार्क केडरमधील ज्युनियर असोसिएट्स पदावरील भरती प्रक्रीयेबाबत अधिसुचना जाहीर करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल पाच हजार पदांसाठी भरती होणार आहे.

बँकेत नोकरी करणाचे स्वप्न बघणाऱ्या लोकांचे स्वप्न आता लवकरच पुर्ण होणार आहे. या पदासाठी उमेदवाराला एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. १७ मेपर्यंत उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.

ज्युनियर असोसिएट्स पदासाठी काही पात्रता आवश्यक आहे. त्यामध्ये अर्ज करणारा उमेदवार भारत आणि राज्य सरकारच्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेलं असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे.

या पदाच्या भरतीसाठी उमेदवाराची ऑनलाईन पद्धतीने पुर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच उमेदवार अर्ज करताना जी प्रादेशिक भाषा निवडेल त्या भाषेत उमेदवाराची परीक्षा घेतली जाणार आहे. ही पुर्व परीक्षा १ तासाची असणार आहे. त्यामध्ये इंग्रजी भाषा तार्किक क्षमता, यासंबंधी १०० प्रश्न विचारले जाणार आहे. ही परीक्षा १०० गुणांसाठी असून या परीक्षेला निगेटिव्ह मार्क सिस्टिम असणार आहे.

दरम्यान, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ७५० रुपये फी भरावी लागणार आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरण्याची गरज नाही.

महत्वाच्या बातम्या-

कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पिकांना दिले जिवामृत, आता कमावतोय लाखो रुपये
शरद पवारांनाही या गावाला भेट देण्याचा मोह आवरला नाही, वाचा खानजोडवाडीची यशोगाथा
गुड न्युज! फक्त ४ लाखात ह्युंदाईची नवी कोरी अलिशान SUV कार मिळणार; जाणून घ्या फिचर्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.