किशोर कुमारच्या पत्नीसोबत रोमान्स करणे जितेंद्रला पडले महागात; किशोर कुमारने दिली होती धमकी

अप्रतिम अभिनेते आणि गायक किशोर कुमारला त्यांच्या कामासाठी खुप वेगळी ओळख आहे. करोडो लोकं त्यांच्या आवाजाचे दिवाने आहेत. प्रोफेशनल आयुष्यासोबतच किशोर कुमार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामूळे देखील खुप चर्चेत असायचे.

किशोर कुमारने चार लग्न केली होती. पण त्यांची चारीही लग्न जास्त काळ टिकू शकले नाहीत. किशोर कुमारने चौथे लग्न केले त्यावेळी ते खुप सांभाळून वागत होते. कारण त्यांना हे लग्न तुटू द्यायचे नव्हते.

त्यांनी चौथे लग्न अभिनेत्री लीना चंद्रावरकरसोबत केले होते. त्यांनी ७० च्या बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता आणि खुप कमी वेळात त्या यशस्वी अभिनेत्री झाल्या होत्या. याच कालावधीमध्ये त्यांची भेट किशोर कुमारसोबत झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर किशोर कुमार त्यांच्या पत्नीला घेऊन खुपच पझेसिव्ह झाले होते. ते त्यांच्या कोणत्याही मित्राला लीनासोबत बोलू देत नव्हते. त्यांना चित्रपटांमध्ये काम करायला देखील नकार होता. पण लीना मात्र करिअर सोडायला तयार नव्हत्या.

या काळात अभिनेते जितेंद्र त्यांच्या होम प्रोडक्शनच्या चित्रपटासाठी अभिनेत्री शोधत होते. त्यांनी या चित्रपटाची ऑफर लीनाला दिली. लीनाने देखील काहीही विचार न करता चित्रपटाला होकार दिला.

किशोर कुमारची इच्छा नसताना देखील लीनाने जितेंद्रसोबत काम करायला होकार दिला. लीनाच्या हट्टासमोर किशोर काहीही करू शकले नाही. चित्रपटाची शुटींग सुरू झाल्यानंतर किशोर कुमार देखील अनेकदा लीनासोबत सेटवर जायचे.

शुटींग मुंबईत सुरू होती तोपर्यंत किशोर कुमार काहीही बोलले नाहीत. पण चित्रपटाची शुटींग बाहेर सुरू झाली त्यावेळी मात्र ते चिडले. त्यांनी पत्नी लीना शुटींगला जाण्यापासून थांबवले. पण त्या काहीही न ऐकता शुटींगला निघून गेल्या.

शुटींग सुरू असताना जितेंद्र आणि लीनाची जवळीक वाढत होती. ही वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि किशोर कुमार रागाने लाल झाले. त्यांचे लीनावर खुप प्रेम होते. म्हणून त्यांना काहीही करता येत नव्हते.

शेवटी किशोर कुमारने जितेंद्र फोन केला आणि लीनापासून दुर राहण्याची धमकी दिली. लीनापासून दुर राहा नाही तर मी यापुढे तुझ्यासाठी कोणतेही गाणे म्हणणार नाही असे त्यांनी जितेंद्रला सांगितले.

सुरुवातीला त्यांना किशोर मस्करी करत आहेत. असे वाटले. पण नंतर त्यांचा राग पाहून त्यांचं डोकं ठिकाण्यावर आलं. किशोर कुमारची ही धमकी ऐकल्यानंतर जितेंद्रने लवकर शुटींग पुर्ण केली आणि लीनाला मुंबईत पाठवून दिले. त्यानंतर त्यांनी चुकूनसुध्दा लीनासोबत काम केले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

लग्नाचे नाव काढल्यानंतर आलिया भट्टला बाथरुममध्ये बंद करण्याची धमकी देतात महेश भट्ट

युपी बिहार लुटण्याच्या चक्करमध्ये कोर्टात पोहोचले होते शिल्पा शेट्टी आणि गोविंदा

जुही चावलाने स्वतःच्याच हाताने केले होते स्वतःचे नुकसान; करिश्मा कपूरला बनवले स्टार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.