जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना दिल्या गुरुपौर्णिमेच्या खास शुभेच्छा

 

मुंबई। आपल्या भारतीय संस्कृतीत आज असलेल्या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आले आहे.

गुरुकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरुची पूजा करणे. त्यांच्यासमोर नतमस्तक होणे, असे या दिवशी अपेक्षित असते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील त्यांच्या गुरूंच्या चरणी नतमस्तक झाले आहेत.

“गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया”, असे म्हणत त्यांनी आजच्या गुरूपोर्णिमेच्या प्रसंगी आपल्या गुरूंना वंदन केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे गुरू म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार हे आहेत. त्यांनी शरद पवार यांना खास ट्विट करून गुरूपोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत, “गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…”

जितेंद्र आव्हाड शरद पवारांना नेहमीच आपल्या गुरूस्थानी मानतात. त्यांच्या अनेक भाषणांमध्ये ते पवारांप्रति असलेले प्रेम, आदर आणि जिव्हाळा बोलून दाखवत असतात.

साध्या चाळीत राहणाऱ्या पोराला त्यांनी मंत्री केले. हे फक्त पवारसाहेबच करू शकतात, असे गौरवोद्गार ते अनेक वेळा काढत असतात.

१ जुलैपासून त्यांनी खास पवारांनी केलेल्या कामावर लिखाण करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी त्याचे आतापर्यंत ५ भाग लिहिले आहेत.

व्यास ऋषींचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. व्यास ऋषी हे संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी चारही वेदांची रचना केली आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.