Homeताज्या बातम्या“गोडसेंचे गोडवे गाणाऱ्यांवर कोणतीच कारवाई नाही, पण मोदींवर टीका करणाऱ्या किरणला देशद्रोही...

“गोडसेंचे गोडवे गाणाऱ्यांवर कोणतीच कारवाई नाही, पण मोदींवर टीका करणाऱ्या किरणला देशद्रोही ठरवतात”

छोट्या पडद्यावरील मालिका मुलगी झाली हो या मालिकेला चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला पसंती मिळत आहे. या मालिकेत किरण माने हे विलास पाटीलची भूमिका साकारत होते.

किरण माने हे सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असतात. अशात त्यांनी सोशल मीडियावर एक राजकीय पोस्ट केली होती. त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत एक पोस्ट केली होती. त्यानंतर किरण माने यांना मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आले आहे. राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले आहे, असा आरोप किरण माने यांनी केला आहे. आता या प्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे ,याला हुतात्मा करणारे, त्याचे गोडवे गाणारे शरद पोंक्षे, विक्रम गोखले आदरणीय कंगना राणावत असे अभिनेते आहेत. पण त्यांच्यावर कोणीही कुठलीही कारवाई केलेली दिसत नाही. पण मोदी सरकारविरोधात कोणी काय बोललं लगेच त्याला देशद्रोही ठरवलं जाते, अशा आशयाची एक फेसबूक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केलीआहे.
फेसबूक पोस्ट-
कोणतीही कला असो, तिच्यावर निर्बंध आले की , समाजाची निकोप सांस्कृतिक वाढ होत नाही. राज्यसत्ता,धर्म, धर्ममार्तंड,यांनी आपल्याला त्रासदायक असणाऱ्या अभिव्यकतीना चेपून टाकले, हे वेगळ्याने सांगायला नको.युरोप इंग्लंड पासून पार भारत देशात हे वागणे नवे नाही.मग तो विषाचा प्याला पिणारा सॉक्रेटिस असो अथवा आयुष्यभर अपमानाचे जिणे पेलणारे ज्ञानेश्वर असोत.सांस्कृतिक दडपशाही नवी नाही.तालिबानी विचारांना आपण हसतो पण त्यासारखे वागणे आपल्या देशात घडतेय याबद्दल सोयीस्कर मौन बाळगले जाते.

साधारणपणे २०१३ पासून विरोधी विचार म्हणजे देशद्रोह ही भावना देशभरात प्रखर झाली..आणि अनेकांना देशद्रोही ठरवण्यात आले.त्यात विद्यार्थी ,शास्त्रज्ञ,लेखक,वेगवेगळ्या क्षेत्रातील कलावंत होते. देशातील सांस्कृतिक दडपशाही बद्दल आवाज उठवणाऱ्या कलावंतावर गलिच्छ टीका केली गेली,शिव्या,धमक्या दिल्या गेल्या.अगदी खून पण केले गेले, कलबूर्गी,डॉ दाभोलकर,गौरी लंकेश..

आता यापुढे अजून एक प्रकार घडलाय.विद्यमान सरकारच्या धोरणावर नाराजी ,टीका केली म्हणून किरण माने या कलावंताला स्टार प्रवाह वाहिनीने काढून टाकले. कलावंताला कामावरून कमी करणे हे चित्रपट , किंवा नाट्यक्षेत्रात तसे नवे नाही पण किरण माने यांना ज्याप्रकारे काढले गेले ते अतिशय निषेधार्ह आहेत.

कोणताही विरोधी विचार आम्ही ऐकून घेणार नाही, ही हुकूमशहा मनोवृत्ती यातून दिसते. स्टार वाहिनीवर किंवा त्या मालिकेच्या निर्मात्यावर, कोणता दबाव आणला गेला, की पुढील घटना वाईट होतील, या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलले, याची कल्पना नाही.

इथे मुद्दा असा की पंतप्रधान मोदी, भाजप आणि त्यांचे पित्ते यावर किरण माने यांनी नाराजी व्यक्त केली. त्यात कोणतेही अर्वाच्य शब्द , घाणेरडी भाषा नव्हती. सोशल व्यासपीठावर ते व्यक्त झाले. तिथे जाऊन त्यांना त्यांचे मत चुकीचे कसे आहे, हे दाखवता येऊ शकले असते. पण असे न करता माने यांच्या उपजीविकेच्या स्तोत्रा वर हल्ला केला गेला.
गंमत अशी की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे ,याला हुतात्मा करणारे, त्याचे गोडवे गाणारे शरद पोंक्षे, विक्रम गोखले आदरणीय कंगना राणावत असे अभिनेते आहेत. पण त्यांच्यावर कोणीही कुठलीही कारवाई केलेली दिसत नाही. याचा दुसरा अर्थ काय? सध्या दडपशाही याला देशभक्ती समजली जाते.

इथे एक उदाहरण आवर्जून द्यावेसे वाटते आणीबाणीच्या काळात किशोर कुमार आणि अनेक अभिनेत्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. पण त्यांना कोणी तुरुंगात टाकले नाही. त्यावेळी सुद्धा तेव्हाच्या सरकारवर टीका करणारे अनेक कलावंत होते. ज्यांना ऐकून घेतले जायचे. त्यांच्या नागरिक म्हणून अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काला अबाधित ठेवले जायचे.

विरोधी विचार म्हणजे शत्रू नाही. हेच सध्या विद्यमान सरकार विसरले आहे. तुम्ही आमच्या बरोबर नाही, म्हणजे आमच्या विरुद्ध आहात, इतका झुंडशाही नियम सध्या प्रचलित आहे. हॉलिवूड मध्ये अनेक अभिनेते सामाजिक दृष्ट्या सजग असतात .डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण कार्यशैलीवर मेरिल स्ट्रीप, जॉर्ज क्लूनी ,रिहाना ,लिओनार्दो कप्रियो,अश्या असंख्य कलाकारांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. पण त्यांच्या कारकीर्दीवर विपरीत परिणाम झालेला आढळून आलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-
बापरे! सातवी पास युवकाने ३० हजारात बनवली ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी..
‘या’ स्मार्टफोनने ओप्पो आणि विवोलाही टाकले मागे, 10 सेकंदात विकले 116 कोटींचे फोन
‘जोहान्सबर्गमध्ये जर विराट कर्णधार असता तर टिम इंडिया हारली नसती’, माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य