Homeताज्या बातम्यापोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

आव्हाड यांनी नुकतेच सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केले होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते, पण त्या वेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे, असे विधान करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर आव्हाडांवर मोठ्या प्रमाणावर टीका सुरु झाली होती.

ओबीसी समाजाबाबत विधान केल्याने अडचणीत सापडलेले मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी गंभीर आरोप केले आहेत. बुधवारी माझ्या घरावर मोर्चा येणार असल्याचं समजतंय. त्यासाठी पुण्यातून दोन बस मागविण्यात आल्या आहेत. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा.., असं आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

आपण श्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटते, पण चारपाच पिढ्यांपूर्वी आपल्या पूर्वजांना मंदिरप्रवेश नव्हता हे ते विसरलेत, असंही आव्हाड यांनी म्हटले होते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना मैदानात उतरावेच लागेल, असं आवाहन त्यांनी भाषणात केले होते. त्यांच्या त्या भाषणाचे व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मंगळवारी रात्री उशिरा आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी २ बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा……. जय भीम!

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना सत्तेची ऊब मिळाल्याने ते आता ओबीसी बांधवांना विसरले आहेत. त्याचमुळे ओबीसींवर माझा विश्वास नाही, ओबीसींना लढायचेच नसते, अशी अपमानकारक विधाने आव्हाड करीत असल्याची टीका भाजप राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे सदस्य व मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांना अचानक ओबीसींचा इतका राग का यायला लागला आहे असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर आव्हाडांच्या या व्यक्तव्यांवर चांगलीच टीका होताना दिसत आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर, सुधीर मुनगंटीवर अशा अनेक नेत्यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
ताज्या बातम्या
 रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळणार? ‘या’ शिवसेना नेत्याच्या सुचक विधानाने चर्चांना उधान
“विराट कोहलीचे आकडे पण रहाणे-पुजारासारखेच, त्याला संघातून का काढून टाकत नाही?”
अनाथांचे पोट भरण्यासाठी ट्रेनमध्ये मागितली भीक; स्मशानात जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाल्ली “
..तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंदही माईंना पाहून खुर्चीवरून उठले होते, पुन्हा व्हायरल होतोय तो व्हिडीओ